शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

पंचरतन कढी

ND
साहित्य : 250 ग्रॅम दही, 50 ग्रॅम बेसन, 1/2 कप हिरवे चणे, 1 बटाटा (चिरलेला), 2-3 शेवग्याच्या शेंगा, 2 मोठे चमचे मुळ्याची पान चिरलेली, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे तूप, 1 चिमूट हिंग, कढी पत्ते, 1/2 चमचा मोहरी, मीठ.

कृती : सर्वप्रथम दह्यात बेसन, मीठ, तिखट आणि 2 कप पाणी घालून चांगले फेटून घ्यावे. भांड्यात तूप गरम करून त्यात हिंग, मोहरी, कढी पत्ता, हिरवी मिरची घालून फोडणी द्यावी. नंतर त्यात दही-बेसनाचा घोळ घालून हालवावे. उकळी आल्यावर सर्व भाज्या घालाव्या. कमी आचेवर कढीला 15 मिनिटापर्यंत शिजवावे. स्वादिष्ट पंचरतनी कढी तयार आहे. या कढीला पोळीसोबत सर्व्ह करू शकता.