कृती : सारण प्रथम कढईत खवा परतून घ्या, त्यावर साखर घाला. परतत रहा. खवा पातळ होईल. वेलची पूड, नारळाचा किस घाला. मिश्रण घट्ट येईपर्यंत शिजू द्या व थंड करण्यास ठेवा.
आवरण : 2 वाटी मैदा, थोडे मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून भिजवून ठेवा. अर्धा तास मुरू द्या. करताना तुपाचा हात घेऊन लहान लहान आकारात गोळे करा. छोटी पुरी लाटून खव्याचे सारण भरून पुरी लाटा. तव्यावर दोन्ही बाजूनी शेकून घेऊन लगेच गरम तुपावर लालसर साटोरी तळून घ्या.