बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

व्हेज लॉलिपॉप

साहित्य : 1 कप उकडून-निथळून-चिरलेला पालक, अर्धा कप पनीर हाताने मोडून, 1 कप उकडलेला बटाटा, 1 कप कॉर्न थोडे ठेचून, कोथिंबीर, मीठ, मिरेपूड, ब्रेडक्रंप लागतील तसे घाला. जिरेपूड, अर्धा कप व्हाइट सॉस, (यासाठी बटरवर 1 टेबलस्पून मैदा परता.) थोडे दूध घाला. घट्ट सॉस बनवा.

कृती : सर्व पदार्थ एकत्र करावेत. त्याचे छोटे अंडाकृती गोळे बनवावेत. आइस्क्रीमचे लाकडी चमचे किंवा सूप स्टिक मोडून त्यावर हे गोळे टोचावे. आणि तळून घ्यावे. जेणे करुन लाल रंग आल्यावर ते बाहेर काढावेत थोडे गार झाल्यावर टोमॅटो सॉसबराबर मुलांना खाण्यास द्यावे.