पॅकेज बुक करताना हे प्रश्न आवर्जून विचारा

Last Modified गुरूवार, 21 जानेवारी 2021 (14:52 IST)
जर आपण सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्रोगाम बनवताना ट्रेवल एजेंसी बुकिंग करण्याची योजना आखत असाल तर आपल्याला काही प्रश्न असे आहे जे आधीच स्पष्ट केले पाहिजे ज्याने आपल्या टूरमध्ये कुठल्याही प्रकाराचे ताण, वाद, अतिरिक्त आर्थिक खर्च किंवा मूड खराब होण्याची स्थिती निर्माण होण्यापासून वाचता येईल.
पॅकेजमध्ये काय काय सामील आहे?
अनेकदा याबद्दल माहिती पूर्णपणे दिलेले नसते. अशात स्पष्ट विचारावे की यात रस्त्यात लागणारे वाहन, टॅक्स, ड्रायव्हरचा खर्च, खाण्या-पिण्याची, पर्यटन स्थळाचे तिकिट इतर व्यवस्था सामील आहे वा नाही.

मुलांसाठी विशेष सुविधा आहे का?
आपण भ्रमण करत असलेल्या ठिकाणी मुलांच्या हिशोबाने व्यवस्था आहे का, जसे मनोरंजन पार्क, फूड, आणि इतर...
पिकअप आणि ड्रॉप पॉइंट कोणते आहे?
आपल्याला सोयीस्कर पडेल असे पिकअप आणि ड्रॉप पॉइंट निवडावे. तसेच आपल्या हॉटेलहून दर्शनीय स्थळापर्यंत जाण्यासाठी वाहनांची सुविधा आहे की नाही ज्याने वेळेवर कोणताही गोंधळ होऊ नये.

सु‍रक्षा व्यवस्था
ट्रेवल करताना रस्ता कितपत सुरक्षित आहे तसेच ट्रेवल एंजसीकडून नियुक्त माणूस विश्वासू असल्याचे सुनिश्चित करावे.
हवामान कसा असेल?
कोणतेही स्थळ निवडताना तिथले वातावरण कसे असेल हे निश्चित करावे. अनेकदा खराब हवामानामुळेे पर्यटनाचा मजा खराब होतो. अती उन्हाळा, पाऊस किंवा थंडीमुळं अडथळे निर्माण होतात.

आहाराची व्यवस्था कशी आहे?
आपल्या आवडीप्रमाणे आहारात पदार्थ सामील आहे की नाही हे स्पष्ट करावे. अनेकदा दुसर्‍या प्रदेशातील आहार प्रत्येकाला पचवणे अवघड जातं. अशात सकाळच्या चहापासून रात्रीच्या भोजनापर्यंत काय-काय सामील आहे जाणून घ्यावे.

डॉक्युमेंट्स
प्रवासासाठी कुठलेही दस्तऐवज हवे ते जाणून घेणे योग्य ठरेल. कारण अनेकदा काही एडवेंचर, किंवा एखाद्या विशेष स्थळी जाण्यासाठी विशेष कागदपत्रांची गरज भासते. अशात आपल्याजवळ ते ओळखपत्र, फोटो, बँक स्टेटमेंट इतर डॉक्युमेंट्स सोबत असणे गरजेचं असतं.

आरोग्य सुविधा काय?
रस्त्यात तब्येत खराब झाल्यास डॉक्टरांची व्यवस्था तसेच सोबत फस्ट एडमध्ये काय- काय उपलब्ध होऊ शकेल हे जाणून घ्यावे.
पॅकेज रद्द करायचे असल्यास?
काही कामामुळे आपलं जाणं निरस्त होत असल्यास पॅकेज रद्द केल्यावर किती टक्के पैसे कापले जातील हे देखील माहीत करून घ्यावे.

हे सर्व मेलद्वारे माहिती केल्यास अर्थात आपल्याकडे लिखित रेकॉर्ड असल्यास अजूनच योग्य ठरेल.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

तडजोड करा

तडजोड करा
नवऱ्या बायकोत भांडणे झाली दोघात अबोला झाला,

हृतिक रोशनचे पालक खंडाळा फार्महाउसमध्ये शिफ्ट झाले मुंबई ...

हृतिक रोशनचे पालक खंडाळा फार्महाउसमध्ये शिफ्ट झाले मुंबई सोडून गेले
मुंबईत कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. अशा परिस्थितीत बेड, रुग्णालये आणि ऑक्सिजन या सर्व ...

वडिलांना सांगा, येऊन गेलो म्हणून ..!

वडिलांना सांगा, येऊन गेलो म्हणून ..!
एक दारुडा रोज रात्री दारुच्या गुत्यावरनं घरी जाताना वाटेत एक शंकराचं देऊळ होतं तिथं बाहेर ...

मी पुढच्या वर्षीच येतो

मी पुढच्या वर्षीच येतो
रम्या एका मोठ्या कंपनीत इंटरव्यू देण्यासाठी गेला.

अहो तो तोंडावर चा मास्क काढा आधी....

अहो तो तोंडावर चा मास्क काढा आधी....
वीज आल्यावर मेणबत्ती विझवायला मी बऱ्याच वेळा फुंकर घातली. जोर लावून पण मेणबत्ती विझायला ...