गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (14:28 IST)

पिकनिकला जाण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, जाणून घ्या ...

फिरायला जाण्यासाठी एका पायावर तयार असलेल्यांची अजिबात कमतरता नाही. भटकंतीचा प्लान बनायचा अवकाश ही मंडळी तयारच असतात. तुम्हीही अशांपैकी एक आहात का? मग फिरायला जाण्याआधी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, कोणत्याही तयारीशिवाय फिरायला गेल्याने आरोग्यावर वाईट परिणामहोऊ शकतो. फिरायला 
जाण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी...
 
* अनेकांना फिरायला जायच्या दोन ते तीन दिवस आधी झोपच येत नाही. ही मंडळी तिथल्या योजनांमध्ये मग्न असतात. त्यांची तयारी सुरू असते. पण फिरायला जाण्याआधी शांत झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सगळी तयारी आधी करून ठेवा. ट्रिपच्या आधी नीट आराम करा.
* फिरायच्या ठिकाणी भरपूर चालायचे असेल तर आधीपासूनच चालण्याच्या सरावाला सुरूवात करा. यामुळे फिरायला गेल्यावर तुमची दमणूक होणार नाही.
* ट्रिपला जाण्याआधी ताणतणाव बाजूला ठेवा. रोजचा ताण बाजूला सारण्यासाठी आपण ट्रिपला जातो. पण तिथेही कामाचा ताण असेल तर काय फायदा. त्यामुळे मस्त तणावमुक्त होऊन एन्जॉय करा. अभ्यास, नोकरीचे टेन्शन बाजूला ठेवा.
* ट्रेकिंगला जायचे असेल किंवा डोंगर चढायचा असेल तर जिने चढायचा सराव करायला हवा. यामुळे पाय दुखणे, अंग दुखणे यासारख्या समस्या जाणवणार नाहीत.
* हॉटेलमधून बाहेर पडताना ब्रेकफास्ट करून निघा. वन डे पिकनिक असेल तर घरातूनच काहीतरी खाऊन निघा. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहाल.