शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (14:52 IST)

Best Honeymoon Destinations: हे भारतातील सर्वात सुंदर आणि रोमँटिक हनिमून डेस्टिनेशन्स आहे

जर आपले नुकतेच लग्न झाले आहे आणि आपण हनिमूनला जाण्याचा विचार करत असाल परंतु कुठे जायचे या गोंधळात असाल तर आता हा गोंधळ दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही बेस्ट हनिमून डेस्टिनेशन ठिकाण. जिथे आपण आपल्या जोडीदारासोबत हनिमूनला जाऊ शकता, ही ठिकाणे भारतातील सर्वोत्तम ठिकाणे म्हणून पाहिली जातात. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 गोवा- गोवा हे भारतातील सर्वात आवडते हनिमून डेस्टिनेशन आहे. सुंदर समुद्रकिनारे, उत्तम हवामान, काजू पार्टी आणि उत्तम रात्रीचे जीवन. गोव्यात कलंगुट बीच, बागा बीच, अंजुना बीच, बागटोर बीच, पालोलेम बीच, सिंकेरियन बीच आणि मिरामार बीच यांसारखे अनेक सुंदर आणि प्रेक्षणीय बीच आहेत.
 
2 काश्मीर - हनीमूनसाठी सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत काश्मीर  आणि लेह-लडाखचा समावेश आहे. आपण श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, द्रास, काश्मीरमध्ये कुठेही जाऊ शकता. ही सर्व ठिकाणे अतिशय सुंदर आहेत. श्रीनगरमधील डल सरोवराला भेट देऊ शकता. 
 
3 लेह-लडाख- लेह-लडाख हा देखील चांगला पर्याय आहे. आपण लेहमध्ये थांबा घेऊन . आपण पॅंगॉन्ग लेक ते नुब्रा व्हॅली आणि खार्दुंग ला पासकडे जाऊ शकता. संपूर्ण लेह लडाख खूप सुंदर आणि बघण्यासारखे आहे.
 
4 हिमाचल - आपण  शिमला आणि मनालीला जाऊ शकता. दोघेही खूप सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ आहेत. पण, जर आपण काही नवीन करू इच्छिता आणि गर्दीपासून दूर राहायचे असेल, तर आपण  स्पिती व्हॅलीला जाऊ शकता. हे देशातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.
 
5 उत्तर पूर्व -संपूर्ण उत्तर पूर्व खूप सुंदर आहे. आपण आपला हनिमून येथे प्लॅन करू शकता. सिक्कीममधील  गंगटोक, मेघालय मधील शिलाँग आणि अरुणाचल प्रदेश मधील तवांग ही सगळीच ठिकाणं खूप सुंदर आहेत. या व्यतिरिक्त, आपण  उत्तर-पूर्वेचे खरे सौंदर्य देखील पाहू शकता.
 
6 राजस्थान -जर आपल्याला डोंगर किंवा समुद्र किनाऱ्यावर जायचे नसेल तर आपण  राजस्थानला आपले हनिमून डेस्टिनेशन बनवू शकता. जयपूर, उदयपूर, जैसलमेर ही सर्व ठिकाणे हनिमूनसाठी उत्तम आहेत. येथे आपण भव्य दिव्य राजवाडे, तलाव आणि वाळू बघू शकता. 
 
7 केरळ - केरळ हे देशातील असेच एक राज्य आहे, जिथे प्रत्येक भारतीयाने एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. अशा परिस्थितीत आपण आपल्या हनिमूनसाठी केरळ जाण्याची निवड करावी.  इथले आरामदायक आणि आल्हाददायक वातावरण आपल्याला नेहमीसाठी लक्षात राहील.