रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

भारतातील या धार्मिक स्थळी साजरी करा दिवाळी

Ayodhya Diwali
भारतात दिवाळीचे पर्व मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. दिवाळी हा सण भारतवासीयांसाठी खूप महत्वाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. कारण या यादिवशी प्रभू राम वनवासातून घरी परतले होते. तसेच श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्यावासींनी दिवे प्रज्वलित केले होते. तसेच भारतात अनेक ठिकाण असे आहे जिथे दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. तर चला जाणून घेऊ या कोणते आहे धार्मिक स्थळ. तुम्ही देखील  त्या ठिकाणी नक्कीच दिवाळीला भेट द्या.  
 
अयोध्या मधील दिवाळी-
दिवाळीच्या दिवशी अनेक पर्यटक राम नगरी अयोध्यामध्ये पोहोचतात. अयोध्यामध्ये शरयू नदीच्या काठावर एकाच वेळी लाखो दिवे प्रज्वलित केले जातात. तेव्हा संपूर्ण शहर उजळून निघते. दिवाळीच्या दिवशी रात्री लेझर लाईट शोचेही आयोजन केले जाते.  
 
वाराणसी मधील दिवाळी-
प्रभू रामाचे शहर, उत्तर प्रदेशचे वाराणसी हे देखील देशातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र शहर मानले जाते, तसेच जिथे दिवाळीचे वैभव पाहण्यासारखे आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी पर्यटक वाराणसीत येतात वाराणसीमध्ये गंगा नदीच्या काठावर लाखो दिवे लावले जातात. दिवाळीनिमित्त काशी विश्वनाथ मंदिरापासून ते अस्सी घाट, दशाश्वमेध घाट आणि मणिकर्णिका घाटापर्यंत सर्व काही लाखो दिव्यांनी सजवले जाते.  
 
पुष्कर मधील दिवाळी-
राजस्थानमधील पुष्कर हे प्रसिद्ध धार्मिक शहर मानले जाते,दिवाळीच्या निमित्ताने पुष्कर तलावाजवळील मंदिरे, किल्ले, राजवाडे आणि इतर इमारतींमध्ये दिवे लावले जातात. तसेच दिवाळीच्या दिवशी देशी-विदेशी पर्यटकही भेट देण्यासाठी येतात. येथे तुम्ही शाही पद्धतीने दिवाळी साजरी करू शकता.  
 
ऋषिकेश मधील दिवाळी-
गंगा नदीच्या काठावर वसलेले ऋषिकेश हे देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ मानले जाते. तसेच ऋषिकेशला योगा सिटी म्हणून देखील ओळखले जाते. दिवाळीच्या दिवशी त्रिवेणी घाटापासून लक्ष्मण झुला, राम झुलापर्यंत दिव्यांनी सजवले जाते.