Marathi Biodata Maker

मंदिरांचं शहर : वाराणसी

सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (16:07 IST)
वाराणसी हे उत्तरप्रदेशातलं एक शहर. वाराणसीला धार्मिक महत्त्व आहे. काशी विश्वेश्वरासह बरीच मंदिरं वाराणसीमध्ये आहेत. इथली गंगा आरती खूप प्रसिद्ध आहे. गंगा घाटावर गंगा नदीची आरती केली जाते. ही आरती बघण्यासाठी तसंच यात सहभागी होण्यासाठी पर्यटक, भाविक या ठिकाणी येतात. वाराणसी बनारस आणि काशी या नावांनीही ओळखलं जातं. वरुणा आणि असी या दोन नद्यांमुळे या शहराला वाराणसी हे नाव पडलं.
वाराणसी उत्तरप्रदेशमधलं प्रमुख शहर आहे. मकर संक्रांत आणि वसंत पंचमीला वाराणसीमध्ये भाविकांची गर्दी झालेली असते. महाशिवरात्रीचा उत्सवही इथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाशिवरात्रीला काशी विश्वेश्वराच्या मंदिरात भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. वाराणसीची लोकसंख्या बारा लाखांच्या घरात आहे. भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकही वाराणसीला जातात. इथे खाण्यापिण्याचीही चंगळ असते. कचोरी सब्जी,चुरा मटर, बनारसी पान, लस्सी, विविध प्रकारच्या मिठाया, समोसे चाखता येतात. वाराणसीमध्ये अनेक देवी-देवतांची मंदिरं असल्यामुळे याला मंदिरांचं शहर म्हणता येईल.
 
नेहा जोशी

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

भारतातील अशी ७ ठिकाणे, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही

'तारक मेहता'मधील बागावर दुःखाचा डोंगर कोसळला, तन्मय वेकारियाच्या वडिलांचे निधन

महाराष्ट्राचा लोहगड किल्ला पुन्हा चर्चेत; सूर्यास्तानंतरचे आवाज आणि सावल्या! रहस्ये अजूनही उलगडलेली नाही

ऐल्फा’ म्हणजे अॅटिट्यूडचा उत्सव... हा मजेदार पॉपकॉर्न एंटरटेनर करताना मी खूप धमाल केली!’ : आलिया भट्ट

स्टेजच्या मागे प्रसूती, दगडाने नाळ ठेचली अन् विठाबाई पुन्हा नाचल्या... लोककलेतील एका जिवंत आख्यायिकेची गोष्ट!

पुढील लेख
Show comments