रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:38 IST)

कुमरकम : पक्षी शास्त्रज्ञांसाठी एक नंदनवन

कुमरकम गाव हे वेम्बन्नाडू तलावातील लहान लहान बेटांचा समूह आहे आणि हा कुट्टानाडू प्रदेशाचा एक भाग आहे. येथे 14 एकरांवर पसरलेले पक्षी अभयारण्य हे स्थलांतरण करणाऱ्या पक्ष्यांचे आवडते ठिकाण आहे आणि पक्षी शास्त्रज्ञांसाठी एक नंदनवनच आहे. बगळे, पाणबुडे, करकोचे, टील्स, पाणकोंबडे, जंगली बदके आणि स्थलांतरण करणारे पक्षी जसे सायबेरियन सारस थव्यांसह येथे येतात आणि पर्यटकांना मोहून टाकतात. कुमरकम अभयारण्यातील पक्षी बघण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बेटांभोवती नौका फेरी.    
कुमरकम हे आकर्षक बॅकवॉटर ठिकाण पर्यटकांना अनेक सुखसोयींचे पर्याय देते. बोटिंग आणि मासेमारी सुविधा ताज गार्डन रिट्रीट येथे उपलब्ध आहे, हे रेट्रीट म्हणजे एका मोठ्या बंगल्याचे रीट्रिटमध्ये रुपांतरण केले आहे. 
 
केरळ पर्यटन विभागाचे बॅकवॉटर  रिसॉर्ट, वॉटरस्केप्समध्ये शांत अशा नारळांच्या बागांमध्ये बांधलेली स्वतंत्र कॉटेजिस आहेत जेथून बॅकवॉटर्सचे सुंदर दृश्य दिसते. पारंपारिक केट्टुवल्लम (तांदूळ वाहून नेणारी नाव), हाऊस बोटचा सुंदर अनुभव हॉलिडे पॅकेज देते.     

स्थान: कोट्टयम्, मध्य केरळपासून 16 किमी दूर.
 
येथे पोहोचण्यासाठी:
जवळचे रेल्वे स्थानक: कोट्टयम्, साधारण 16 किमी
जवळचा विमानतळ: कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोट्टयम्  शहरापासून साधारण 76 किमी.