मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

जगातील शांतताप्रिय देश

जगात अनेक देशात हिंसाचार सुरुच आहे. त्यात देशात राहणे म्हणजे कधी प्राण धोक्यात पडेल हे सांगता येत नाही; पण जगात असेही देश आहे की, तेथे शांतता कायम नांदत असते. सर्व लोक अत्यंत प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने राहतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंस्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक पीस (आयईपी) ने तयार केलेल्या आघाडीच्या शांतताप्रीय देशांची माहिती.


1) डेन्मार्क : युरोपमधील हा देश अत्यंत सुंदर आहे. शांतताप्रिय देशांच्या यादीत याचा पहिला क्रमांक आहे. कोपेनहेगन ही या देशाची राजधानी. डॅनिश लोक एकमेकांशी भांडण्यास प्राधान्य न देता स्वतःचे आणि पर्यायाने देशाचा कसा अर्थीक विकास होईल, यासाठी प्रयत्न करतात. येथील लोक मनमिळावू आणि मैत्रीपूर्ण जीवन जगणारे आहेत.


2) नॉर्वे : हा यूरोपमधील दुसर्‍या क्रमांकाचा शांतताप्रिय देश आहे. उत्तर ध्रुवीय प्रदेशात हा देश वसलेला असल्याने निसर्गाने या देशाला भरभरुन सौंदर्य दिले आले. या देशाचे सरकार नेहमीच शांततेला प्राधान्य देते. येथे शांतता पाहून हा एक राहण्यासाठी अत्यंत सुरक्षित देश मानला जातो. येथील लोक मैत्रीपूर्ण जीवन जगण्यास प्राधान्य देतात.


सिंगापूर : हा देश जगातील तीसर्‍या क्रमांकाचा शांतताप्रिय देश आहे. 1965 मध्ये स्वातंत्र्य मिळल्यानंतर या देशाने शांततेस प्राधान्य देताना आर्थिक,  सामाजिक आणि सांस्कृतिक आघाडीवर मोठी बाजी मारली आहे. शेजारच्या प्रत्येक देशाशी या देशाचे सोहार्द्तेचे संबंध आहेत. हा देश संयुक्त राष्ट्राच्या प्रत्येक विधायक मोहिमेस प्राधान्याने पाठिंबा देतो.

स्लोवेनिया : हा एक चौथ्या क्रमांकाचा शांतताप्रिय युरोपियन देश आहे. आकाराने अत्यंत लहान असलेल्या या स्लोवेनियाने हिंसाचारास कधीच स्थान दिले नाही. एखद्या वेळेस काही अनुचित घटना घडली तरी तेथील पोलिस आणि सुरक्षा अधिकारी तसेच सामाजिक संघटना तातडीने धाव घेऊन त्यावर तोडगा काढतात. या देशातील अनेक शहरे निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहेत.

स्वीडन : हा उत्तर युरोपमध्ये वसलेला आणि निसर्गसौंदर्य लाभलेला अत्यंत सुंदर देश आहे. शांतताप्रिय देशांच्या यादीत या देशाचा पाचवा क्रमांक लागतो. उल्लेखनीय म्हणजे शस्त्रे निर्यात करणार्‍या युरोपियन देशांच्या यादीत हा देश अग्रेसर आहे. अमेरिकेच्या तुलनेत (दरवर्षी साडेतीन लाख चोर्‍या) या देशात दरवर्षी सरासरी 9 हजार किरकोळ चोर्‍या होतात.

आइसलँड : हा एक जगातील अत्यंत शांतताप्रिय देश आहे. हा देश जगातील अनेक वादग्रस्त मुद्द्यांपासून स्वतःला दूर ठेवतो. येथील ग्लेशियर आणि ज्वालामुखी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक या देशाला भेट देण्यास प्राधान्य देतात. रेकज़ॅविक हे शहर या देशाची राजधानी असून, ते अत्यंत संदर आहे.