1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: बुधवार, 1 जानेवारी 2020 (14:51 IST)

भारतातील काही बर्फाच्छादित शहरं

Some of the snowiest cities in India
थंडीत विविध ठिकाणी बर्फ पडू लागतो. भारतातली काही ठिकाणं बर्फ पडल्यामुळे पांढरीशुभ्र झाल्याचं पाहायला मिळतं. अशाच काही बर्फाच्छादित शहरांची सैर करू या.
हिमाचल प्रदेशातलं डलहौसी हे अत्यंत सुंदर असं ठिकाण. डिसेंबर-जानेवारी महिन्यात डलहौसीमध्ये बर्फ पडतो. लॉर्ड डलहौसीच्या नावावरून या स्थानाला हे नाव पडलं.
उत्तराखंडमध्ये औली हे ठिकाण आहे. हे स्थान समुद्रसपाटीपासून 10,500 फूट उंचीवर आहे. इथल्या बर्फाच्छादित उतारांवरून मस्तपैकी स्कीईंग करता येतं. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात इथे भरपूर बर्फ पडतो.
अरूणाचल प्रदेशमधलं तवांग हे असंच एक सुंदर शहर. तवांग प्रांत हे देशाचं एक रत्नच आहे असं म्हणावं लागेल. डिसेंबरमध्ये बर्फ पडल्यानंतर तवांग अजूनच सुंदर दिसू लागतं.
गंगटोक ही सिक्किमची राजधानी. फेब्रुवारी महिन्यात इथे भरपूर बर्फ पडतो. बर्फ पडत असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने इथे येतात. या ठिकाणी बुद्ध मंदिरं आहे. गंगटोक हे अत्यंत टुमदार शहर आहे.
 
जानेवारी महिन्यात लाचुंगमध्येही भरपूर बर्फ पडतो. हे सिक्किमजवळां शहर आहे. या ठिकाणी आल्यावर लाचुंग मॉनेस्ट्रीला भेट द्या यलाच हवी.
 
वैष्णवी कुलकर्णी