1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (19:01 IST)

Mistakes on flights फ्लाईटमध्ये तुम्हीपण करता का या चुका?

flight
फ्लाईटमध्ये ट्रैवल करताना आपला ड्रेस आरामदायक असला पाहिजे. कधी-कधी एकाच जागी बसल्या बसल्या ब्लड सर्कुलेशन थांबू लागत आणि बॉडी पेन सारखी समस्या झेलावी लागते. ड्रेसच नव्हे तर फुटविअर आणि 
परफ्यूम सिलेक्ट करताना ही काही गोष्ट लक्षात ठेवाव्या... आम्ही आज शेअर करत आहोत असेच काही महत्त्वाचे टिप्स: 
 
* भारतात यात्रा करत असताना जास्त शॉर्ट ड्रेसेज घालण्यापासून वाचावे, कारण कोणत्याही प्रकाराच्या कॉन्ट्रोवर्शिअल कंडीशनला समोरा जायला नको.
 
* फ्लाईटमध्ये टाइट कपडे घालणे टाळावे. कारण एका जागी बसल्यामुळे ब्लड फ्लो असंतुलित झाल्यास त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
* प्लॅनमध्ये स्ट्रॉग परफ्यूम लावून जाऊ नये. जवळ बसलेल्या पॅसेंजर्सला दमा किंवा ब्रिदिंग प्रॉब्लम असल्यास त्यांचा त्रास अधिक वाढू शकतो.
 
* प्लॅनमध्ये हाय हिल्स टाळा. याने टाचांमध्ये वेदना होऊ शकतात. अशात टर्मिनलवर चालावे लागले तर त्रास अधिक वाढू शकतो.
 
* वूलन जॅकेट घालून बसू नका. हवं असल्यास बॅगमध्ये गरम कपडे जवळ असू द्या, जे गरज पडल्यास वापरू शकता.
 
* फ्लाईटमध्ये मॉइश्चर अब्जॉर्ब करणारे कपडे घालावे. म्हणून सिंथेटिक नव्हे तर कॉटन, सिल्क किंवा लिनेन फेब्रिक योग्य राहतील.
 
* यात्रेकरूंनी पायात मोजे किंवा स्टॉकिंग्स घालू नये विशेषतः गर्भवती महिलांनी तरी मुळीच नाही. कारण याने ब्लड सर्कुलेशन थांबतं आणि पायाला सूज येण्याची शक्यता वाढते.
 
* फ्लाईटमध्ये पायजमा घालणे टाळावे. लेट नाइट फ्लाईट असल्यास एकाध वेळेस हे धकेल पण पायजमा घालून फिरणे योग्य दिसतं नाही.
 
* प्लॅनमध्ये नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे घालावे ज्याने जवळ बसलेले पॅसेंजर्स आरामात आपल्या जवळ बसू शकेल. नाहीतर त्याच्यासाठी यात्रा कठिण जाईल. 
 
* काही लोकं फ्लाईटमध्ये जोडे काढून ठेवतात. पण दुसर्‍यांचाही विचार करा. अनेकदा मोज्यातून येणारा वास दुसर्‍यांना नकोसा होऊ शकतो. तसेही हे एटिकेट्सच्या विरुद्ध आहे.
 
* प्लॅनमध्ये लांग ड्रेसेज किंवा आजूबाजूने पसरलेले कपडे घालणे टाळावे नाहीतर टॉयलेट यूज करण्यात समस्या येईल.
 
* प्लॅनमध्ये एअर ड्राय असते आणि ह्यूमिडिटीही 10-20 टक्के अधिक असते. म्हणून कॉन्टॅक्ट लेन्सऐवजी चश्मा वापरावा. नाही तर डोळे ड्राय होण्याची समस्या होऊ शकते.