शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (16:13 IST)

Honeymoon Planning : गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी जाणून घ्या

गोव्याचे नाव घेताच येथील सुंदर समुद्रकिनारे, खाद्यपदार्थ, संस्कृती आणि पार्ट्या यांचा विचार लोकांच्या मनात नक्कीच येतो. नवीन जोडप्याचे लक्ष वेधून घेण्यात हे शहर कधीही मागे नाही. हे शहर नवीन जोडप्यासाठी सुंदर सूर्यास्त,आरामदायी वातावरण आणि थंड हवामानासाठी  सर्वोत्तम आहे. रोमँटिक डेस्टिनेशनसह, एडव्हेंचर्स साठी  आणि इतर अनेक गोष्टीं मुळे हे शहर आपल्या सहलीला सर्वोत्तम बनवते. चला जाणून घेऊया इथे बघण्यासारखे काय आहे? 
 
1) बटरफ्लाय बीचवर सूर्यास्त - बटरफ्लाय बीचवर मावळत्या सूर्याला पाहणे खूप आल्हाददायक आहे. येथील आकर्षण दरवर्षी हजारो पर्यटकांना, विशेषतः नवविवाहित जोडप्यांना आकर्षित करते. याशिवाय डॉल्फिन पाहणे आणि कयाकिंग यांसारखे उपक्रम एक वेगळे रोमँटिक अनुभव देतात. 
 
2) दूधसागर वॉटर फॉल्स - दूधसागर धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य प्रत्येक सहलीला   ट्रिपच्या शीर्षस्थानी राहते. हिरवेगार घनदाटजंगल आणि निसर्ग सौंदर्याने वेढलेले हे ठिकाण येथे आपण टॅक्सीने जावे आणि 60 किमीच्या निसर्गरम्य प्रवासाचा आनंद घ्यावा.  
 
3) वॉटर स्पोर्ट्स - गोव्यात आपण अनेक प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. जसे स्कुबा डायव्हिंग आणि जेट स्कीइंग. आपण इथे या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद नक्की घ्या.
 
4) शांत बीच -गोव्यात अनेक बीच आहेत. अशा स्थितीत काही बीच असे असतात जिथे कमी लोक जातात. आपण जोडीदारासह त्या बीचवर जाऊ शकता आणि कॅन्डल लाईट डिनरचा आनंदही घेऊ शकता. 
 
5) पार्टी -गोवा रात्रीच्या जीवनशैली साठी प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत आपण एक दिवस इथे नाईट पार्टी अटेंड करू शकता. गोवा हे प्रेमी युगलांसाठी  उत्तम ठिकाण आहे. पोर्तुगीज संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी गोव्यात यावे. समुद्र किनारे ते पार्ट्यां आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यापर्यंत, गोव्याला भेट  देण्यासाठी इथे कुठल्याही गोष्टींची कमतरता नाही.