सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (22:16 IST)

होर्मुज जजीरा : इथल्या मातीचा वापर चटणी म्हणूनही केला जातो...कुठे आहे हे ठिकाण?

मिसबाह मन्सुरी
निळाशार समुद्र, सोनेरी झरे आणि मोहक क्षारयुक्त मैदानं यांमुळे रांनी भरलेलं इराणचं होर्मुज जजीरा हे बेट सर्वांगाने सुंदर आहे.
 
'भू-शास्त्रज्ञांचं डिस्नेलँड' म्हणूनही या बेटाची दुसरी ओळख आहे.
 
इराणच्या दक्षिण दिशेला असलेल्या होर्मुज बेटाच्या किनाऱ्यावर एका लाल रंगाच्या टेकडीवर आम्ही उभे होतो. माझ्या गाईडने मला म्हटलं, "तुम्ही या मातीची चव नक्की घेतली पाहिजे. तिथला तो उंच डोंगर समुद्राच्या लाटांना अंगा-खांद्यावर खेळवत होता."
 
पर्शियन खाडी
इराणच्या किनाऱ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर पर्शियन खाडीच्या निळ्याशार पाण्यात होर्मुज जजीरा एका थेंबाच्या आकाराप्रमाणे दिसतं.
 
याठिकाणी अनेक ठिकाणी क्षारयुक्त मैदानं आणि काही टेकडीवजा ठिकाणं आहेत.
इथं विविध प्रकारची दगडं, माती आणि लोहयुक्त ज्वालामुखीचे डोंगर आहेत. हा परिसर लाल, पिवळ्या, नारंगी रंगाने चमकत असतो.
 
इथं 70 पेक्षा जास्त प्रकारचे खनिज आढळून येतात. 42 चौरस किलोमीटर आकाराच्या या बेटावरची प्रत्येक संरचना अद्वितीय अशीच आहे.
डॉ. कॅथरीन गोडाईनोव्ह यांनी पूर्वी इराणमध्ये काम केलेलं आहे. त्या सध्या ब्रिटिश भू-शास्त्र सर्वेक्षण या संस्थेत मुख्य भू-शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात. त्यांच्या मते, लाखो वर्षांपूर्वी पर्शियन खाडीत समुद्रामधून येथील क्षारयुक्त मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली होती.
 
क्षारयुक्त मैदानांचं मोहक स्वरुप
या बेटाची निर्मिती होताना क्षार आणि खनिजांनी भरलेल्या लाटा एकसारख्या ज्वालामुखीयुक्त डोंगरांना धडकत राहिल्या. त्याच्याच संयोगाने एका रंगीत भूभागाची निर्मिती झाली.
 
डॉ. गोडाईनोव्ह म्हणतात, "गेल्या 50 कोटी वर्षांदरम्यान क्षारयुक्त जमिनीचा पृष्ठभाग ज्वालामुखीच्या पदरांमध्ये दबून गेला आहे.
क्षारयुक्त पाणी सातत्याने या ठिकाणी येऊन धडकल्यामुळे याठिकाणी मिठाचे डोंगर तयार झाले आहेत. अशाच प्रकारे येथील जमिनीच्या आतल्या भागातही पृष्ठभागावर क्षारयुक्त जमिनीची चादर पसरली आहे. या संपूर्ण भौगोलिक प्रक्रियेमुळे सोनेरी झरे, लाल समुद्रकिनारा आणि मोहक क्षारयुक्त जमिनी असं स्वरुप या बेटाला प्राप्त झालं आहे.
 
रेनबो आर्यलँड
होर्मुज हे रेनबो आर्यलँड म्हणूनही ओळखलं जातं. इथल्या जमिनीला मिळालेल्या विविध रंगांच्या रंगसंगतींमुळे हे नाव अगदी चपखल बसतं.
 
खरं तर खाऊ शकता येणारा हा जगातला एकमेव डोंगर आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
 
इथल्या गाईडने मला इथं आल्या-आल्याच इथल्या जमिनीची चव घेण्याचा सल्ला दिला होता.
इथं आढळून येणारी कोरडी माती गेलिक नावाने संबोधली जाते. ती त्यातल्या हेमेटाईटमुळे तशी दिसते. ज्वालामुखीच्या डोंगरांमध्ये आढळून येणाऱ्या आयर्न ऑक्साईडमुळे त्याला हे स्वरुप प्राप्त होतं.
 
त्याचा वापर स्थानिक बाजारपेठेत औद्योगिक उपयोगासाठी केला जातो, तसंच स्थानिक पाककृतींमध्येही त्याचा वापर होतो.
 
त्याचा वापर जेवणामध्ये मसाल्याप्रमाणे केला जातो. यामुळे रश्शाला एक प्रकारची मातीची चव मिळत, तसंच डबल ब्रेड तोमशी हा पदार्थ बनवतानाही याचा वापर करण्यात येतो.
 
तोमशी म्हणजेच एखाद्या गोष्टीचं अधिक असणं होय.
 
फरजाद यांची पत्नी मरियम म्हणते, "लाल मातीचा वापर चटणी म्हणूनही करता येऊ शकतो."
 
या चटणीला 'सुर्ख' असं म्हणतात. डबल रोटी तयार झाल्यानंतर त्यावर ही चटणी लावली जाते.
 
भोजनात वापर करण्याशिवाय स्थानिक चित्रकार त्याचा वापर रंगांमध्येही करतात.
 
लोक याचा वापर कपडे रंगवण्यासाठी, सिरॅमिक वस्तू तसंच सौंदर्य प्रसाधनं बनवण्यासाठीही करतात.
 
क्षारांचा सकारात्मक परिणाम
या लाल डोंगराव्यतिरिक्त होर्मुज बेटावर इतरही अनेक गोष्टी आहेत. बेटाच्या पश्चिमेला एक क्षारांचाच बनलेला डोंगर आहे. त्याला 'नमक देवी' असं म्हटलं जातं.
एक किलोमीटरवर पसरलेल्या उंचच उंच भिंती आणि गुहेमध्ये मिठाचे क्रिस्टल्स भरलेले आहेत. हे संगमरवराच्या महाराच्या स्तंभांशी मिळतं-जुळतं असं आहे.
 
स्थानिक लोकांच्या मते, या मिठामध्ये नकारात्मक प्रवृत्ती आणि विचारांना नष्ट करण्याची ताकद आहे.
 
इथं चालत असताना गाईडने मला माझ्या पायातले बूट काढण्यास सांगितलं. माझे पाय इथल्या मिठांना स्पर्श करावेत, असं तो म्हणाला.
 
इथल्या मिठाने सकारात्मक परिणाम होतात, असं त्याने मला सांगितलं.
 
'ताकद की घाटी'
या डोंगरावर वेळ घालवल्यानंतर तुम्हाला ऊर्जावान वाटू लागतं. म्हणून त्याला 'ताकद की घाटी' असंही संबोधलं जातं.
 
बेटाच्या नैऋत्य दिशेला इंद्रधनुष्य द्विप आहे. तिथं विविध रंगी माती आहे. त्याठिकाणी लाल, पिवळे आणि निळ्या रंगाचे डोंगर दिसून येतात.
इथले दगड ऊन लागताच चमचम चमकू लागतात. इथं मूर्तींचं डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंगरावर हवेमुळे दगडांना विविध आकार प्राप्त झाले आहेत. असं असलं तरी अनेक पर्यटकांना याबाबत माहिती नाही.
 
इराणच्या पोर्ट्स मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार 2019 मध्ये इथं फक्त 18 हजार पर्यटक आले होते.
 
इरशाद शान या स्थानिक नागरिकाने मला सांगितलं की इथला परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसितच होऊ शकला नाही.
 
होर्मुजच्या प्राथमिक सोयीसुविधांवर तसंच विकासावर लक्ष देण्यात आलं असतं तर हे पर्यटनासाठी केंद्र बनलं असतं, असं त्यांचं मत होतं.
 
जगाचं लक्ष वेधलं
इथं फिरायला येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक लोकांकडून वाहनं भाड्याने देण्यात येतात. तसंच जेवणाची सोयही केली जाते.
 
शान म्हणतात, " होर्मुजसाठी ही आमची जबाबदारी आहे. ही आमची ओळख आहे. पर्यावरणाच्या या वारशाकडे जगाचं लक्ष केंद्रीत करण्यासाठी आम्ही आमची भूमिका निभावतो.
 
नंतर मी इथं मासे, लाल कांदे, लिंबू आणि माल्टा खाल्ला. अतिशय सुगंधित आणि मसालेदार रशाने एक अनामिक समाधान दिलं.
 
भू-शास्त्रज्ञांसाठी खरंच हे 'डिस्नेलँड' आहे. त्यासोबतच इथली खाण्यायोग्य माती इथल्या लोकांना आणखीनच खास बनवत असेल.