1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जुलै 2021 (08:20 IST)

मातीच्या माठात पाणी थंड का राहत जाणून घ्या.

Learn
उन्हाळ्यात लोक थंड पाणी पिण्यासाठी फ्रीजचा वापर करतात,तर खेड्यात थंडपाणी पिण्यासाठी लोक मातीच्या भांड्यांचा म्हणजे माठाचा वापर करतात.या मातीच्या भांड्यात पाणी थंड कस काय राहत जाणून घेऊ या.
 
पाणी थंड होणं बाष्पीभवनच्या क्रियेवर अवलंबून असत.जेवढे जास्त वाष्पीभवन होत पाणी तेवढेच थंड होत.धातूच्या भांड्यांच्या तुलनेत बाष्पीभवन प्रक्रिया मातीच्या भांड्यात लवकर होते कारण मातीच्या भांड्यात लहान छिद्र असतात जे आपण डोळ्याने बघू शकत नाही.माठात पाणी या छिद्रांमधून माठाच्या पृष्ठभागावर येत आणि बाहेरील उष्णतेमुळे बाष्पीभवन प्रक्रिया होते,या प्रक्रियेत माठाच्या आतील भागाचं तापमान कमी होत.बाष्पीभवनची ही प्रक्रिया उन्हाळ्यातच चांगल्या प्रकाराची होते. हेच कारण आहे की उन्हाळ्यात धातूच्या भांड्यांच्या तुलनेत मातीच्या माठात पाणी थंड राहतं.