घश्याच्या संसर्गासाठी काळीमिरी,मध,आणि आलं फायदेशीर आहे जाणून घ्या
काही नैसर्गिक औषधे अशी आहे जी संसर्ग आणि अनेक रोग दूर करण्यात प्रभावी आहे.आपल्या स्वयंपाकघरात अश्या अनेक गोष्टी असतात. परंतु आपल्याला त्याचा योग्य वापर कसा करावा हे माहिती नसत.अशीच एक गोष्ट आहे आलं,मध आणि काळीमिरी हे घेतल्याने आपण श्वासाच्या समस्या आणि घशात होणाऱ्या संसर्ग आणि वेदने पासून आराम मिळवू शकतो.आणि काही घरघुती उपचारांनी बरे देखील करू शकतो.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे अशा परिस्थितीत आपल्याला घश्याशी संबंधित काहीही त्रास असल्यास आपण याचे सेवन करून या त्रासातून मुक्तता मिळवू शकता.
मध आणि आल्याचा आरोग्यावर बरेच चमत्कारिक परिणाम होतात .हे प्रतिकारशक्ती वाढविण्या बरोबरच त्यांना श्वसनाच्या समस्यांपासून मुक्तता देखील देतात.
आलं आणि मधाचे फायदे आपापल्या ठिकाणी उत्कृष्ट आहे.याचा वापर केल्याने आपल्याला आरोग्याचे फायदे मिळतात.या साठी आपण 1 चमचा आल्याचं रस घ्या त्यात 1 चमचा मध आणि चिमूटभर काळीमिरपूड घाला.
हे सेवन केल्याने आपल्याला घश्याच्या त्रासापासून मुक्ती मिळेल.या मध्ये अँटी इंफ्लिमेंट्री आणि अँटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात यामुळे हे बऱ्याच दृष्टीने फायदा देतात.आलं,काळीमिरी आणि मधाचे मिश्रण हे चांगले एक्स्पेक्टोरेन्ट आहे,जे कफ,सर्दी आणि वाहत्या नाकापासून आराम मिळवून देतात.