मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 25 जून 2021 (20:18 IST)

हे 10 पदार्थ मधुमेहाचे मोठे शत्रू आहेत जाणून घ्या

मधुमेह झाल्यावर खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णाला काही खाद्य पदार्थां पासून लांब राहणे आवश्यक असते.याच्या सह चांगले आरोग्यदायी आहाराचे सेवन देखील करावे लागते.मधुमेह कमी असल्यास तरी त्रासदायक आहे आणि जास्त असल्यास देखील त्रासदायी आहे.  
 
चला जाणून घेऊ या की मधुमेहाच्या रुग्णांनी कोणते 10 खाद्य पदार्थ खाऊ नये-
 
 
1 मधुमेहाच्या रुग्णांनी सर्वप्रथम गोड खाणे बंद केले पाहिजे.न्याहारीत गोड दही,चॉकलेट,गोड कांदे,बिस्किटे,धान्ये खाऊ नये.तसेच पराठे,कचोरी,चाट,डबाबंद फळे हे अजिबात खाऊ नये.
 
 
2 मधुमेहाच्या रुग्णांना जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे. पनीर, सॉस,चीझ,क्रीम,साय,मोरावळा आणि सीताफळ खाणे टाळावे.
 

3 मधुमेहाच्या रुग्णांना बटाटा,रताळ्याचे सेवन करणे टाळावे.
 

4 केळी,द्राक्षे,चिकू,लिची आणि सीताफळ याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांनी करू नये.
 

5 संपूर्ण चरबीयुक्त दूध,कँडी,खजूर खाणे टाळावे.
 

6 मधुमेह नियंत्रित करण्यासाठी अनेकदा कारल्याच्या रसाचे सेवन केले जाते.जर आपली साखर आधीपासूनच कमी आहे तर आपण कारल्याच्या ज्यूसचे सेवन करू नये.
 

7 आवळ्याचा मोरावळा खाणे टाळा.
 

8 मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाऊ नये.किंवा अतिशय कमी प्रमाणात सेवन करावे.पिकलेल्या आंब्यात 25-30 ग्रॅम कार्बोहायड्रेट असत.या मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते म्हणून आंबा खाणे टाळावे.
 

9 सुके मेवे विशेषतः बेदाणे (किशमिश) चे सेवन करू नये.या मध्ये नैसर्गिक गोडवा असतो,हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतो.
 

10 साखर असल्यावर गोड खाऊ नये तसेच मीठ देखील कमी प्रमाणात खाणे आवश्यक आहे.