शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: बुधवार, 23 जून 2021 (08:45 IST)

कीटक-पतंगे प्रकाशाकडे का आकर्षित होतात?जाणून घ्या

बऱ्याच वेळा आपण बघतो की दिवे विझल्यावर जेथे प्रकाश असतो त्याच्या जवळ अनेक कीटक एकत्र होतात.आणि बऱ्याच वेळा ते कीटक त्या प्रकाशाजवळ गेल्यावर त्याच्या उष्णतेमुळे जळून मरतात.तरीही हे कीटक त्या प्रकाशाकडे का आकर्षित होतात.चला जाणून घेऊ या.  
 
एका संशोधनातून असे आढळून आले आहे की प्रकाशाकडे फक्त नर कीटकच आकर्षित होतात मादा कीटक नव्हे.
 
वास्तविक असं म्हटले जाते की या मादा कीटकातून एक विशिष्ट प्रकाराचा वास येतो जो नर कीटकांना आपल्याकडे आकर्षित करतो.अशाच प्रकाराचा वास नर कीटकांना येणाऱ्या प्रकाशातून येतो आणि ते त्या वासाकडे आकर्षित होतात.
 
त्यांना असे वाटते की तिथे मादा आहे म्हणून ते प्रकाशाकडे जातात.बऱ्याचवेळा ते त्या प्रकाशाच्या इतक्या जवळ जातात की त्या प्रकाशाच्या उष्णतेमुळे होरपळून मरतात.
 
काही कीटकांची सुंघण्याची क्षमता एवढी तीव्र असते की ते 11 किमी दूरवरून या वासाला सुंघू शकतात आणि हेच कारण आहे की कीटक प्रकाशाकडे आकर्षित होतात.