शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : सोमवार, 21 जून 2021 (23:13 IST)

कोविड -19 च्या डेल्टा प्लसची नवीन लक्षणे कोणती आहे, तज्ञांकडून जाणून घ्या

भारतातील कोरोना विषाणूचे दुसरे प्रकरण खूपच भयानक आहे.18 वर्षाच्या आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या 45 व्या वर्षावरील लोकांवर याचा खोल परिणाम झाला आहे. पण हे व्हेरियंट काय आहे? का वारंवार ते परिवर्तीत होत आहे.ज्याचे निदान करणे हे मोठे आव्हान सिद्ध होत आहे.दुसऱ्या लाटे मध्ये डेल्टा व्हेरियंट हे मोठे कारण सांगितले गेले आहे.आता एक नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंट समोर येत आहे.
वेबदुनिया ने या बदलणाऱ्या व्हायरस बद्दल अरबिंदो मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. सुस्मित कोस्टा यांच्याशी चर्चा केली चला जाणून घेऊया ते काय म्हणाले.
 

डेल्टा प्लस व्हेरियंट म्हणजे काय आहे?
 
 सुरुवातीपासून आपण कोविड बघितले आहे ते स्पाइक प्रोटीन मध्ये आहे.हे मानवाच्या आत शिरून पेशींमध्ये संसर्ग पसरवते.ही या विषाणूची प्रवृत्ती आहे.ही सतत बदलत असते.प्रथम डेल्टा अल्फा होते B.1.617.1 नंतर दुसरी लाट आली.या मध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळले जे खूप प्रभावी होता.डेल्टा व्हेरियंट B.1.617.2 होता.आता नवीन व्हेरियंट 63 म्युटंटसह येत आहे.तर आता एक नवीन म्युटेशन कोड होत आहे ज्याचे नाव K 417n आहे.
 
 
जेव्हा आपण म्युटेशन बद्दल बोलतो तर ते एंटीजन कोणत्या ठिकाणी म्युटंट होत आहे जिनोमिक म्युटेशन ज्या ठिकाणी होतो तो एक क्रमांकावरचा आहे.त्याचे प्रोटीन सिक्वेशन्स काय आहे आणि तो कसे म्युटंट करतो.त्याला परी आणि पोस्ट च्या आधारे विश्लेषित करतात.
 

डेल्टा व्हेरियंट बद्दल बोलावे तर त्यावर लस प्रभावी आहे. ज्यांना कोविडची लागण झाली आहे त्यांच्यात अँटीबॉडीज तयार झाले आहे.ज्यांच्या मध्ये अँटीबॉडीज बनल्या आहे त्यांच्या वर हे म्युटंट किती प्रभावी आहे त्यांच्या वर संशोधन सुरू आहे.  
 

जर अँटीबॉडीज नवीन व्हेरियंट समोर काम करत नाही तर संसर्गाचा धोका वाढू शकतो.याचे प्रकाराने सध्या कमीच आले आहे.
 

आजच्या काळात नवीन व्हेरियंट ओळखण्यासाठी अधिकाधिक सिक्वेन्सिंग करण्याची गरज आहे.याच्या मदतीने लवकर निदान केले जाऊ शकते.
 

भारतात सिक्वेन्सिंग ला घेऊन काय तयारी केली आहे. 
 
भारतात सिक्वेसिंग कमी आहे मुख्यतः पुणे आणि दिल्ली मध्ये आहे. सॅम्स मध्ये याची सुरुवात लवकर केली जाईल.याच्या मदतीने व्हेरियंट बघणे सोपे होईल.सध्या हे एनएव्ही पुणे येथेच सिक्वेन्सिंग होत आहे.
 

डेल्टा प्लस व्हेरियंट ही तिसरी लाट आहे ?
 
ही शक्यता असू शकते. लसीकरणानंतर, शरीर नटीजन विरुद्ध अँटीबॉडीज तयार करतो.जेव्हा एखादा आजार होतो तर आपण त्याच्याशी लढू शकतो.आपल्या शरीरात अँटी बॉडी तयार झाल्या असतात आणि या नवीन व्हायरस वर हे काम करत नाही तर ही तिसरी लाट असू शकते. यावर सखोल संशोधन सुरु आहे.म्हणून हे सांगू शकत नाही की नवीन व्हायरसवर अँटीबॉडीज काम करत आहे की नाही.
 
 

डेल्टा प्लस व्हेरियंट शरीराच्या कोणत्या भागावर सर्वाधिक परिणाम करतो ?
 

याचा परिणाम श्वसनमार्गावर होतो आणि ओटीपोटात संक्रमण(जी आय ट्रेक )ला अधिक प्रभावित करतो.
 
 

मुलांवर याचा काय परिणाम होणार?


मुलांची प्रतिकारक क्षमता चांगली असते.जे म्युटेशन होत मुलं त्याला स्वीकारतात जर त्यांचे शरीर या नवीन व्हेरियंट ला स्वीकार करत नाही तर हे त्यांच्यासाठी धोकादायक असू शकतो.या वर संशोधन सुरु आहे.म्हणून हे सांगू शकत नाही की मुलांवर हे किती प्रभावी असेल.
 


डेल्टा प्लस मध्ये काय खबरदारी घ्यावयाची आहे? 
 


असा विचार करू नये की आता लस घेतली आहे तर काहीही होणार नाही.सध्या संशोधन सुरु आहे.अँटीबॉडी आपल्यां मध्ये बनली आहे आणि अँटीजेन त्याच्यावर काम करत नसेल तर रिइन्फेक्ट होऊ शकत.मास्क लावा,सामाजिक अंतर राखा,कारण कोविड हा संसर्गजन्य रोग आहे.हा एकापासून दुसऱ्याकडे सहज जातो.ज्यांची प्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांना या आजाराची लागण लवकर लागते.आणि ते त्यांच्यासाठी जीवघेणा होऊ शकतो.