सोन्याच्या दरात पुन्हा वाढ
येत्या काही दिवसात सोन्याच्या दरात चढ उतार सुरूच आहे.मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्यावर आता या आठवड्याच्या सुरुवातीस सोन्याचे दर वाढले आहेत.
आज सोमवारी (21 जून) रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर 0.40 टक्क्यांनी वाढला. तर चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.MCX वर चांदीचा दर 0.16 टक्क्यांनी घसरला. मागील आठवडयामध्ये गुरूवारी, शुक्रवारी सोन्याचा दर अंदाजे 1600 रूपयांनी कमी झाला होता. दरम्यान जून महिन्याच्या सुरूवातीला सोन्याचा दरात 2500 रूपयांची घट नोंदली गेली.
भारतात सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडी परिणाम करतात मागील महिन्यात सोन्यामध्ये गुंतवणूक कमी झाली.सोन्याच्या इटीएस मध्ये गुंतवणूक 57 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे.आजचा सोन्याचा भाव 4702 प्रति ग्राम आहे.तर 22 कॅरेट सोन्याचे दर 4542 प्रति ग्राम आहे. चांदीचा दर प्रतिकिलो 67,635 रूपये इतका आहे.
सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असणे अनिवार्य केले असताना नियमानुसार 14,18,22 कॅरेट च्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉल मार्क असल्यावरच दागिने विकत घेता येणार.सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क नसल्यास सराफ व्यापाऱ्याला दागिन्यांच्या किमतीच्या पाचपटीने दण्ड आकारण्यात येईल तसेच एक वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो.