चांगली बातमी : आता सोनं झालं स्वस्त आजच खरेदी करा
आपण सोनं घेण्याचा विचार करीत आहात तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण होतं आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमधील उच्च पातळीच्या तुलनेत सोनं सध्या 9,200 रुपयांनी स्वस्त झाले.या आठवड्यात आतापर्यंत सोन्याच्या वायदा भावात 1500 रुपयांची घसरण झाली आहे.सोन्याचा दर दहा ग्रॅम 49,000 रुपयांच्या पातळीवरून घसरून 47,000 रुपयांच्या पातळीवर आला आहे.
शुक्रवारी आज सोन्याचा वायदा भाव 47,000 रुपयांच्या वर व्यवहार करीत आहेत. गुरुवारी सोन्यात 1500 रुपयांची मोठी घसरण झाली. इंट्रा डे मध्ये सोन्याची किंमत 46744 रुपयांवर घसरला .क्लोजिंग देखील 47,000 रुपयांच्या खाली होती.
या आठवड्याच्या सुरुवातीस, सोमवारी सोने 48523/10 ग्रॅम होते, तर शुक्रवारी सध्या ते 46958-10 ग्रॅमवर ट्रँडिंग करीत आहे.
सोन्याची किंमत 9200 रुपयांनी स्वस्त झाली आहे
मागील वर्षी, कोरोनाच्या संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, ऑगस्ट 2020 मध्ये, MCXवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56191 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली. आज ऑगस्ट वायदा भाव MCXवर सोनं प्रति 10 ग्रॅम 47000 रुपयांच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही जवळपास 9200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
चांदी घसरली
गुरुवारी चांदीच्या वायदा भावात देखील मोठी घसरण झाली .दर 10 ग्रॅमच्या किंमती 68,000 रुपयांच्या खाली आल्या.काल चांदीचा वायदा भाव दर किलोमागे 3870 रुपयांच्या मोठ्या घसरणीसह बंद झाला. आज चांदीचे वायदे भाव 800 रुपये प्रतिकिलो वाढीसह व्यापार करीत आहेत. या आठवड्यात चांदीचा वायदा भाव 3600 रुपयांनी खाली आला आहे.