बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जून 2021 (16:07 IST)

खाद्य तेलाचे नवे दर जाणून घ्या

गेल्या एक वर्षापासून खाद्य तेलाच्या किंमती गगनाला भिडले होते. खाद्यतेलाच्या किंमती घसरण्यास सुरुवात झाल्याने आता सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या एक महिन्यात खाद्य तेलाच्या किंमती घसरण्यास सुरूवात झाली असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सांगितले. काही प्रकरणांमध्ये ही घट 20 टक्क्यांच्या आसपास आहे.
 
मोहरीचे तेल 10% स्वस्त
सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की 16 मे 2021 रोजी देशात मोहरीच्या तेलाची किंमत प्रति किलो 175  रुपये होती, जी आता जवळपास 10% खाली येऊन 157 रुपये प्रति किलो झाली आहे. त्याचप्रमाणे 20 मे रोजी मुंबईत सोयाबीन तेलाची किंमत 162 रुपये प्रति किलो होती, जी आता खाली येऊन 138 रुपयांवर आली आहे.
 
पाम तेलाच्या किंमतीही खाली आल्या
देशात पाम तेलाच्या किंमतीही खाली आल्या आहेत. 7 मे रोजी त्याची किंमत 142 रुपये प्रतिकिलो होती, जी आता खाली प्रति लिटर 115 रुपयांवर आली आहे. अशा प्रकारे, त्याची किंमत 19% कमी झाली आहे. त्याचबरोबर सूर्यमुखी तेलदेखील 16% स्वस्त होऊन 157 रुपये प्रतिकिलो विकलं जात आहे. 5 मे रोजी त्याची किंमत 188 रुपये प्रति किलो होती.
 
शेंगदाण्याचं तेल 16 रुपयांनी स्वस्त
देशाच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणा शेंगदाणा तेलाची किंमत 14 मे रोजी 190 रुपये किलो होती, जी आता खाली येऊन 174 रुपयांवर आली आहे. त्याचप्रमाणे, 2 मे रोजी वनस्पतींच्या किंमतीही 8 टक्क्यांनी घसरून 141 रुपयांवर आल्या.
 
खाद्यतेलात भारत 'आत्मनिर्भिर' होईल
खाद्य तेलांची देशांतर्गत मागणी भागविण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल, यासाठी देश खाद्य तेलमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार मध्यम व दीर्घकालीन उपाययोजना करीत असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सध्या भारत आपल्या खाद्य तेलाच्या आवश्यकतेचा एक मोठा भाग आयातातून पूर्ण करतो.