1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 20 जून 2021 (13:37 IST)

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं!

Petrol-diesel prices rise again! marathi business news in marathi webdunia marathi
देशात सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामध्ये लॉक डाऊन मुळे आर्थिक संकट आलेच आहे. त्यावर आता सामान्य जनतेवर पेट्रोल डिझेलचे वाढीव दराचे संकट आले आहे. अलीकडील 5 राज्यात झालेल्या निवडणुकीमुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझलच्या किमतीत वाढ झाली असून सर्व सामान्य जनतेच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.काही भागात तर पेट्रोल ने शंभरी गाठली आहे.मुंबईत देखील पेट्रोलचे दर शंभराच्या वर गेले आहे.सर्व सामान्य जनतेला आपली आर्थिक घडी कशी मांडायची हा मोठाच प्रश्न उद्भवत आहे.शनिवारी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नसल्याने आणि लॉक डाऊन काढण्यात आले असून  विकेंड च्या मूड मध्ये असलेल्या सामान्य जनतेला दिलासा मिळाला होता.परंतु आज रविवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.    
 
देशाची राजधानी दिल्लीमध्ये रविवारी पेट्रोल प्रतिलिटर 97रुपये 22 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 87 रुपये 97 पैसे दराने विकलं जात आहे.दुसरीकडे आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलसाठी मुंबईकरांना प्रतिलिटर 103 रुपये 36 पैसे तर डिझेलसाठी 95 रुपये 44 पैसे आकारावे लागणार.
 
भोपाळमध्ये हेच दर अनुक्रमे 105 रुपये 43 पैसे आणि 96 रुपये 65 पैसे इतके आहेत. तर दुसरीकडे पाटण्यामध्ये पेट्रोल डिझेलचे नवीन दर 99 रुपये 28 पैसे आणि 93 रुपये 30 पैसे झाले आहे. 
 
राज्यांचा विचार करता गेल्या दीड ते दोन महिन्यांत झालेल्या पेट्रोल दरवाढीमुळे देशातील ८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलचे भाव शंभरीच्या वर गेले आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे.