स्वातंत्र्यसंग्रामाचा साक्षीदार झाशीचा किल्ला
India Tourism : भारताचा इतिहास हा समृद्ध असून अनेक शूरवीर या भारतभूमीला लाभले. आज आपण अश्याच एका शूरवीर धाडसी व्यक्तिमत्व असलेल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत. राणी लक्ष्मी बाईंचा बलाढ्य असा किल्ला हा उत्तर प्रदेश मधील झाशी शहरात आहे. जो आजही स्वातंत्र्यसंग्रामाचा साक्षीदार आहे. तसेच भारताच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचे व्यक्तिमत्व अद्भुत होते. त्या प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक होत्या. राणी लक्ष्मीबाई या स्वातंत्र्यलढ्यातील एक नायिका होत्या.
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात असलेल्या या किल्ल्यावर राणी लक्ष्मीबाई राहत होत्या. झाशीचा किल्ला हा बागिरा टेकडीच्या माथ्यावर आहे. जो राजा बीर सिंग देव यांनी 17 व्या शतकात बांधला होता. 1857च्या स्वातंत्र्ययुद्धात या किल्ल्याचा काही भाग नष्ट झाला. तसेच किल्ल्यावर गणपतीचे मंदिर आणि संग्रहालय देखील आहे. येथे असलेले वॉर मेमोरियल आणि राणी लक्ष्मीबाई उद्यान हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. हा किल्ला भारतातील सर्वोच्च किल्ल्यांमध्ये गणला जातो.
झाशीच्या राणीचा हा किल्ला 15 एकरात पसरलेला आहे. किल्ल्यातील ग्रॅनाईटच्या भिंती 16 ते 20 फूट जाडीच्या आहे. झाशी किल्ल्याला प्राचीन काळापासून महत्त्व आहे. या किल्ल्याला दहा दरवाजे आहे. प्राचीन राजेशाही वैभव आणि शौर्याचा जिवंत साक्ष असलेल्या झाशीच्या किल्ल्यामध्ये बुंदेलखंडच्या घटनात्मक इतिहासाची उत्कृष्ट माहिती देणाऱ्या शिल्पांचाही चांगला संग्रह आहे.सा हा प्राचीन झाशीची किल्ला आज देखील इतिहासाची साक्ष देत आणि स्वातंत्र्यसंग्रामाचा साक्षीदार म्हणून भक्कमपणे उभा आहे.
झाशीच्या किल्ला जावे कसे?
विमानमार्ग-
झाशीपासून जवळ ग्वाल्हेर विमानतळ आहे, जे झाशीपासून 103 किमीअंतरावर आहे आणि दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ झाशीपासून सुमारे 321 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळावरुन खासगी वाहन किंवा कॅब करून झाशी शहरात पोहचता येते.
रेल्वे मार्ग-
दिल्ली-चेन्नई रेल्वे मार्गावरील झाशी रेल्वे जंक्शन असून हे रेल्वे मार्गाचे मुख्य स्टेशन आहे, झाशी शहराला रेल्वेने मुंबई, दिल्ली, चेन्नई, आग्रा, भोपाळ, ग्वाल्हेर इत्यादी देशातील इतर काही मोठ्या शहरांशी जोडते.
रास्ता मार्ग-
झाशी शहर आग्रा, दिल्ली, खजुराहो, कानपूर, लखनौ इत्यादी देशातील अनेक मोठ्या शहरांना रस्त्याने जोडते. ज्यामुळे खासगी वाहन किंवा बसच्या मदतीने झाशीला पोहचता येते.