रहस्यमयी गढकुंदर किल्ला मध्यप्रदेश
India Tourism : भारतामध्ये अनेक शूरवीर राजांनी महाराजांनी शासन केले आहे. तसेच शासन काळात अनेक गढ, किल्ले उभारण्यात आले जे आज देखील भक्कमपणे उभे राहून इतिहासाची साक्ष देतात. भारतातील प्राचीन किल्ल्यांचा इतिहास आणि वास्तुकला जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो किल्ले बांधलेले आहे. त्याचबरोबर असे किल्ले आहे ज्यांच्या इतिहासाबद्दल किंवा बांधकामाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. भारतात असा एक रहस्यमयी किल्ला आहे. या किल्ल्याबद्दल असे सांगितले जाते की येथे लग्नाची मिरवणूक बेपत्ता झाली होती आणि आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही.
भारतातील या रहस्यमय किल्ल्याचे नाव गढकुंदर किल्ला आहे जो 1500 ते 2000 वर्षे जुना मानला जातो. या किल्ल्यावर चंदेल, खंगार अशा अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले आहे. हा किल्ला मध्य प्रदेशातील निवाड़ी जिल्ह्यातील एका छोट्या गावात आहे.
रहस्यमय या किल्ल्याला पाच मजले आहे पण त्यातील दोन मजले जमिनीखाली आहे. हा किल्ला कधी आणि कसे बांधला याबाबत ठोस पुरावे नाही.
तसेच हा किल्ला भारतातील सर्वात रहस्यमय किल्ल्यांमध्ये गणला जातो. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, एकदा जवळच्या गावातून लग्नाची मिरवणूक या किल्ल्यावर आली होती. लग्नाची मिरवणूक या गडाला भेट देण्यासाठी आली असता तळघरात भटकत तो अचानक गायब झाली. आजपर्यंत या मिरवणुकीचा शोध लागलेला नाही असे सांगण्यात येत आहे. यानंतर अशा घटनेमुळे किल्ल्याचा खालचा भाग बंद करण्यात आला.
तसेच किल्ल्याची विशेषतः म्हणजे गडकुंदर किल्ला एखाद्या भूलभुलैयापेक्षा कमी मानला जात नाही. किल्ल्याच्या जास्त आत गेल्यास रस्ता चुकू देखील शकतो असे येथील स्थानिक नागरिक सांगतात. गडावर दिवसाही अंधार असतो. तसेच असे मानले जाते की किल्ल्यात एक खजिना लपलेला आहे, जो शोधण्यासाठी लोक गेले आणि आपला जीव गमावला. पूर्वीच्या काळी सोन्या-चांदीचे दागिनेही खालच्या मजल्यावर ठेवले जायचे त्यामुळे लोक खाली जाऊ लागले. जी नंतर बंद करण्यात आली.