मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (07:30 IST)

कात्यायनी देवी मंदिर अवेरसा

Katyayani Devi
शारदीय नवरात्री म्हणजे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना होय. दुर्गा देवीच्या नऊ रूपांपैकी सहावे रूप म्हणजे देवी कात्यायनी. तसेच कात्यायनी देवीचे हे मंदिर कर्नाटक मधील अंकोला जवळ एवेर्सा मध्ये कात्यायनी बाणेश्वरी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. ऋषी कात्यायन यांची मुलगी असल्यामुळे देवीच्या या रुपाला कात्यायनी म्हणतात. तसेच वृंदावन, मथुरा, भूतेश्वर मध्ये स्थित असलेले कात्यायनी वृंदावन हे शक्तीपीठ जिथे माता सतीचे केशपाश पडले होते.
 
कात्यायनी देवी आख्यायिका-
देवी दुर्गा मातेचे हे कात्यायनी नाव कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही आख्यायिका पुराणात आहे. देवी कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते.  
 
दुर्गा देवीच्या या कात्यायनी रूपाचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्यने भक्त एवेर्सा मध्ये दाखल होतात. नवरात्रीत देवीआईची विशेष पूजा केली जाते. नवीन वस्त्र, अलंकार चढवून देवी आईची महाआरती केली जाते. नवरात्रीत हे मंदिर विशेष सजवण्यात येते.  
 
देवी कात्यायनीचे हे मंदिर रस्ता, रेल्वे, विमान तसेच जलमार्गाने देखील जोडलेले आहे. हे मंदिर राष्ट्रीय राजमार्ग 17 पासून फक्त 1 किमी अंतरावर आहे.