मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

ब्रम्हचारिणी मंदिर वाराणसी

Brahmacharini Temple Kashi
दुर्गा मातेच्या नऊ रूपांपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. तसेच ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या‍ दिवशी साधकाचे मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणार्‍याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे आहे.
 
तसेच देवीआईच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या देवीला तपश्चा‍र‍िणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात.
 
दुर्गा देवीचे दुसरे रूप आहे ब्रम्हचारिणी, तसेच ब्रम्हचारिणी देवीचे मंदिर हे वाराणसी मधील बालाजी घाटावर स्थित आहे. ब्रम्हचारिणी अर्थात तपाची चारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी देवी. असे मानले जाते की, ब्रम्हचारिणी अर्थात जेव्हा त्यांनी तपश्चर्या करून शिवाला प्राप्त होते. 
 
काशीतील गंगा तीरावर असलेल्या बालाजी घाटावर असलेल्या माँ ब्रह्मचारिणी दुर्गा मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होत आहे. विशेषत: नवरात्रीच्या दिवसांत रात्री दोन वाजल्यापासूनच भाविक दर्शनासाठी प्रसाद घेऊन रांगेत उभे राहतात.
 
नवरात्रीच्या दिवसातही येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काशीमध्येही रामलीला आयोजित केल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की जो भक्त खऱ्या मनाने मातेची पूजा करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. 
 
देवी ब्रम्हचारिणीने एक हजार वर्षापर्यंत फळे खाऊन तपश्चर्या केली. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे.
 
भारतातील कोणत्याही शहरातून ब्रह्मचारिणी मंदिरापर्यंत सहज पोहोचता येते. तसेच यासाठी मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली इत्यादी कोणत्याही शहरातून रेल्वेने वाराणसी रेल्वे स्थानकावर पोहोचता येते. वाराणसी रेल्वे स्थानकावरून तुम्ही टॅक्सी किंवा कॅबने मंदिरात सहज पोहोचू शकता.  
 
तसेच विमान मार्गे जायचे असल्यास  सर्वात जवळचे विमानतळ लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून तुम्ही टॅक्सी किंवा कॅबने मंदिरापर्यंत पोहचू शकतात.