'या' ठिकाणी गणपतीची सर्वात उंच मूर्ती आहे, जगभरातून लोक भेट द्यायला येतात

thailand city of ganesh
Last Updated: बुधवार, 22 जून 2022 (08:53 IST)
भारतात गणपती हे आराध्य आणि लाडके दैवत आहे. भारतात गणपतीला समर्पित अनेक मंदिरे आहेत. देशाच्या विविध भागात गणेशाची विविध रूपात पूजा केली जाते. पण आपल्याला हे

माहित आहे का की गणपतीची सर्वात उंच मूर्ती भारतात नाही तर परदेशात आहे. होय, गणपतीची सर्वात उंच मूर्ती थायलंडमध्ये आहे. चला
जगातील सर्वात उंच गणपतीच्या मुर्तीबद्दल जाणून घेऊया.
थायलंडमधील ख्लोंग ख्वेन शहरातील एका आंतरराष्ट्रीय उद्यानात गणपतीची
सर्वात उंच मूर्ती आहे. हे शहर चाचोएंगसाओ आणि 'सिटी ऑफ गणेश ' म्हणूनही ओळखले जाते. गणपतीची मूर्ती 39 मीटर उंच असून ती कांस्य धातूची आहे. गणपतीची ही मूर्ती फार जुनी नसून ती 2012 साली पूर्ण झाली. ही मूर्ती काश्याच्या 854 वेगवेगळे भाग मिसळून तयार केली आहे. ही मूर्ती थायलंडच्या राजकन्येने स्थापित केली होती.

या मूर्तीमध्ये गणपतीच्या मस्तकावर कमळाचे फूल ठेवले जाते आणि मध्यभागी ओम तयार केला आहे. या मूर्तीमध्ये गणेशाच्या हातात चार पवित्र स्थाने दर्शविली आहेत ज्यात फणस, आंबा, ऊस आणि केळी यांचा समावेश आहे. ही सर्व फळे थायलंडमध्ये पवित्र कार्यात वापरली जातात. गणेशाच्या पोटाभोवती साप गुंडाळलेला आहे आणि सोंडेत लाडू आहे. मूर्तीमध्ये उंदीर गणेशाच्या पायाशी बसलेला दिसतो. त्याच्या हातात ब्रेसलेट आणि पायात दागिने आहेत. थायलंडमध्ये गणपतीची भाग्य आणि यशाची देवता म्हणून पूजा केली जाते.
याशिवाय थायलंडच्या फ्रांग अकात मंदिरात गणपतीची 49 मीटर उंचीची मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये गणपतींना बसलेले दाखवले आहे. त्याच वेळी, थायलंडमधील समन वट्टा नरम मंदिरात गणपतीची 16 मीटर उंचीची मूर्ती आहे.गणपतीची ही मूर्ती पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात.
यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Cuttputlli Teaser:'कठपुतली'चा टीझर लाँच, अक्षय कुमार ...

Cuttputlli Teaser:'कठपुतली'चा  टीझर लाँच, अक्षय कुमार क्राइम थ्रिलर चित्रपटात माइंड गेम्स खेळताना दिसेल
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा पुढचा चित्रपट पपेट (कटपुतली) चा टीझर लाँच ...

प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान कतरिना कैफ क्लिनिकमध्ये ...

प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान कतरिना कैफ क्लिनिकमध्ये पोहोचली, विकी कौशलही होता सोबत
गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीबाबत सातत्याने चर्चा होत आहेत.मात्र, या ...

अभिनेत्री सोमी अलीने अभिनेता सलमान खानवर केले हे गंभीर आरोप

अभिनेत्री सोमी अलीने अभिनेता सलमान खानवर केले हे गंभीर आरोप
बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अभिनेत्री सोमी अलीने ...

KWK 7कतरिना कैफ- विक्की देणार कॉफी विथ करण 7 मध्ये गोड ...

KWK 7कतरिना कैफ- विक्की देणार कॉफी विथ करण 7 मध्ये गोड बातमी !
अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे चर्चेत आहे. विमानतळावर ती ...

मॉर्डन सुनेची पूजा

मॉर्डन सुनेची पूजा
सासूबाई: अगं सुनबाई, तो पानावर लाल लाल चिकट पदार्थ काय आहे? नवीन मॉर्डन सुनबाई: मला ...