बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शनिवार, 28 सप्टेंबर 2024 (07:00 IST)

भारतातील पाच प्रसिद्ध दुर्गा मंदिर

jvala devi
ऑक्टोंबर महिन्यात शारदीय नवरात्रोत्सव सुरु होणार असून दुर्गा मातेच्या नऊ दिव्या रूपांच्या पूजेचे पर्व सुरु होत आहे. या पवित्र नऊ दिवसांत देवीची आराधना करणे दर्शन घेणे अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. तसेच भारतात दुर्गा मातेचे जागृत असे काही मंदिरे आहे जिथे देवी मातेच्या कृपेने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.तर चला जाणून घेऊन दुर्गा मातेचे पाच प्रसिद्ध मंदिरे जिथे शारदीय नवरात्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भक्तगण दाखल होतात व देवीचे दर्शन घेतात. 
 
ज्वाला देवी मंदिर हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यामध्ये असलेले प्राचीन ज्वालादेवी मंदिर हे माता जगदंबाचे एक प्राचीन आणि जागृत मंदिर आहे. या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही किंवा प्रतिमा नाही. तर, देवी आईचे  रूप मानल्या जाणाऱ्या खडकातून सतत धगधगणारी ज्योत येथे आहे. देवी आईच्या कृपेने येथे भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे.
 
vaishnv devi
माँ वैष्णो देवी मंदिर जम्मू आणि काश्मीर
जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथे स्थित असलेले माँ वैष्णो देवी मंदिर हे माता दुर्गाचे  प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे भाविकांना माता वैष्णोदेवीच्या गुहेपर्यंत पायी जावे लागते. तसेच देवीआईच्या कृपेनें कृपेने येथे भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. तसेच माँ वैष्णो देवी मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. इथे दररोज हजारोंच्या संख्येने भक्त देवीचे दर्शन घेतात.
 
anambaji devi
अंबाजी मंदिर गुजरात
गुजरातच्या अरवली पर्वत रांगेत असलेले अंबाजी मंदिर देवी अंबिकाला समर्पित आहे. तसेच येथे माता दुर्गाची मूर्ती काळ्या पाषाणापासून बनवण्यात आली आहे. तसेच अंबिका मताच्या कृपेने येथे भाविकांना सुख-समृद्धी मिळते, असे मानले जाते.
 
tulja bhavani
तुळजा भवानी मंदिर महाराष्ट्र 
महाराष्ट्रातील तुळजापूर मध्ये असलेली तुळजाभवानी ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ मानले जाते. तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. तसेच महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये तुळजाभवानी देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते. तसेच संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून भवानीमातेला मान आहे. 
 
kamkhya devi
कामाख्या मंदिर, आसाम
आसामच्या कामरूप जिल्ह्यात स्थित कामाख्या मंदिर हे काली मातेचे प्रसिद्ध आणि जागृत देवी मंदिर आहे. येथे देवीआईचे योनीपीठ असून ते देवीस्वरूपात पूजले जाते. तसेच येथे कामाख्या देवी आईच्या  कृपेने भाविकांना मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे.
 
दुर्गा मातेची ही सर्व 5 मंदिरे त्यांच्या प्राचीनतेसाठी आणि धार्मिक महत्त्वासाठी ओळखली जातात.तसेच या मंदिरांमध्ये देवीआईच्या कृपेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. यामुळे नवरात्रीच्या काळात येथे मोठी गर्दी होते.