गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (07:00 IST)

दुर्गा मातेच्या नऊ रूपांशी जोडलेले खास मंदिरे

9 Secrets of Navadurga
3 आक्टोंबर पासून शारदीय नवरात्रीस सुरवात होत आहे. शारदीय नवरात्रीत दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. हे माता पार्वतीचेच नऊ रूप आहे. या नऊ रूपांचे देशभरात अनेक मंदिरे आहे. पण काही खास ठिकाणचे मंदिरे हे प्रमुख मंदिर आहे जिथे माता दुर्गाचे नऊ रूप पूजले जातात. तर चला पाहूया दुर्गा मातेच्या नऊ रूपांचे नऊ प्रमुख मंदिरे कुठे कुठे आहे. 
 
1. शैलपुत्री मंदिर काशी- 
दुर्गा मातेचे प्रथम रूप आहे शैलपुत्री, तसेच शैलपुत्री देवीचे मंदिर हे काशी घाटावर स्थित आहे. माता शैलपूत्रीचे हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. शैल अर्थात हिम पर्वत, हिमालयाची मुलगी असल्याकारणारे दुर्गा मातेच्या पहिल्या रुपाला शैलपुत्री असे म्हणतात. असे मानले जाते की, जन्म झाल्यानंतर माता पहिल्यांदा इथे आली होती व इथेच विराजमान झाली. 
 
2. ब्रम्हचारिणी मंदिर वाराणसी-
दुर्गा देवीचे दुसरे रूप आहे ब्रम्हचारिणी, तसेच ब्रम्हचारिणी देवीचे मंदिर हे वाराणसी मधील बालाजी घाटावर स्थित आहे. ब्रम्हचारिणी अर्थात तपाची चारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी देवी. असे मानले जाते की, ब्रम्हचारिणी अर्थात जेव्हा त्यांनी तपश्चर्या करून शिवाला प्राप्त होते. 
 
3. चंद्रघंटा मंदिर प्रयागराज-  
दुर्गा देवीचे तिसरे रूप आहे चंद्रघंटा, तसेच चंद्रघंटा देवीचे मंदिर हे प्रयागराज मध्ये स्थित आहे. माता पार्वतीचे चंद्रघंटा रूप आहे ज्यांना चंद्रमोळी शिवाजी पती रूपात प्राप्त झाले. चंद्रघंटा अर्थात ज्यांच्या मस्तकावर अर्धचंद्र स्थित आहे. 
 
4. कुष्मांडा मंदिर कानपूर-
दुर्गा देवीचे चौथे रूप आहे कुष्मांडा. तसेच हे कुष्मांडा देवीचे मंदिर हे कानपूर मधील घाटमपूर ब्लॉक मध्ये स्थित आहे. आपल्या उदरामध्ये संपूर्ण ब्रम्हाण्डला सामावून घेणारी देवी म्हणून कुष्मांडा ओळखली जाते. 
 
5. स्कंदमाता मंदिर वाराणसी-
दुर्गा मातेचे पाचवे रूप आहे स्कंदमाता, तसेच स्कंदमाता देवीचे मंदिर हे हिमाचल मधील खनाल मध्ये स्थित आहे. कार्तिकेय अर्थात स्कंदची माता असल्याकारणारे दुर्गामातेच्या या रुपाला स्कंदमाता म्हणतात.  
 
6. कात्यायनी मंदिर एवेर्सा- 
दुर्गा मातेचे सहावे रूप आहे कात्यायनी, तसेच कात्यायनी देवीचे मंदिर कर्नाटक मधील अंकोला जवळ एवेर्सा मध्ये कात्यायनी बाणेश्वरी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. ऋषी कात्यायन यांची मुलगी असल्यामुळे देवीच्या या रुपाला कात्यायनी म्हणतात. वृंदावन, मथुरा, भूतेश्वर मध्ये स्थित असलेले कात्यायनी वृंदावन हे शक्तीपीठ जिथे माता सतीचे केशपाश पडले होते.
 
7. कालरात्री मंदिर वाराणसी-   
दुर्गा मातेचे सातवे रूप आहे कालरात्री, तसेच कालरात्री देवीचे मंदिर हे वाराणसी मध्ये स्थित आहे. कालरात्री अर्थात संकटांचा नाश करणारी. माता माता कालरात्रीने राक्षसांचा वध केला म्हणून दुर्गामातेच्या या रूपाची पूजा रात्री केली जाते. 
 
8. महागौरी मंदिर लुधियाना-   
दुर्गामातेचे आठवे रूप आहे महागौरी, तसेच महागौरी या देवीचे मंदिर पंजाब मधील लुधियाना मध्ये स्थित आहे. गौर अर्थात श्वेत म्हणजे महागौरी म्हणून ओळखली जाते. असे म्हणतात की, पार्वती देवीचे शरीर तपामुळे काळे पडले होते यामुळे शिवाजींनी त्यांना गौर वर्ण प्रदान केला होता. 
 
9. सिद्धीदात्री मंदिर सागर- 
दुर्गा मातेचे नववे रूप आहे सिद्धीदात्री, तसेच सिद्धीदात्री देवीचे हे मंदिर मध्यप्रदेशमधील सागर मध्ये स्थित आहे. देवी आपल्या समर्पित भक्तांना प्रत्येक प्रकारची सिद्धी देते याकरिता दिवीचे नवने रूप सिद्धीदात्री म्हणून ओळखले जाते.