शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : गुरूवार, 29 ऑगस्ट 2024 (07:28 IST)

मधुर महागणपती मंदिर केरळ

Madhur Temple Kerala
दक्षिण भारतातील केरळ राज्य आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. या राज्यामध्ये एक असे गणेश मंदिर स्थित आहे, ज्याला केरळचे सिद्धिविनायक मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. काही दिवसांतच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. या वर्षी गणपती बाप्पांचे आगमन 7 सप्टेंबर ला होणार आहे. 
 
गणेश चतुर्थीच्या पवित्र पर्वावर अनेक लोक देशातील प्रसिद्ध आणि पवित्र गणेश मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी निघतात. तसेच आपण आज एक केरळमध्ये असलेल्या प्रसिद्ध मधुर महागणपती मंदिराबद्दल जाणून घेऊ या. तसेच या गणपती पर्वावर तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात या अप्रतिम मंदिराला. केरळमध्ये असलेले मधुर महागणपती देखील एक असे गणेश मंदिर आहे. जिथे दर्शनासाठी लाखो लोकांची गर्दी होते. या मंदिराला केरळचे सिद्धिविनायक मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. तर चला जाणून घ्या मधुर महागणपतीशी संबंधित काही रंजक गोष्टी ज्या आज देखील भक्तांना आकर्षित करतात.
 
मधुर महागणपती मंदिर इतिहास-
मधुर महागणपती मंदिराला अनेक लोक मधुर मदनंतेश्वर सिद्धिविनायक मंदिर नावाने देखील ओळखतात. हे प्रसिद्ध मंदिर केरळच्या कासरगोडमधील मधुर मध्ये स्थित आहे. तसेच हे मंदिर भगवान गणेश यांना समर्पित आहे. 
 
मधुर महागणपती मंदिरचा इतिहास अतिशय प्राचीन मानला जातो. असे सांगितले जाते की या मंदिराचे निर्माण 10 व्या शतकात दक्षिण भारताच्या मायपदी शासकव्दारा करण्यात आले होते. या मंदिराचा 15 शतकात जीर्णोद्धार करण्यात आला होता.
 
मधुर महागणपती मंदिर वास्तुकला-
मधुर महागणपती मंदिराची वास्तुकला पर्यटकांना खूप आकर्षित करते. हे मंदिर त्रिस्तरीय गजप्रतिष्ठा वास्तुकलेने बांधले आहे. त्रिस्तरीय गजप्रीथा हत्तीच्या पाठीसारखी दिसते.
 
मधुर महागणपती मंदिर बद्दल सांगितले जाते की, याला बनवण्यासाठी लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. लाकडावर असलेले नक्षीकाम रामायणमधील काही दृश्य दर्शवतात. तसेच या मंदिराचा इतिहास टिपू सुल्तानाशी जोडलेला आहे. ज्याने अनेक वेळेस मंदिराला नष्ट करण्याचा विचार केला होता. 
 
मधुर महागणपती मंदिर पौराणिक कथा-
मधुर महागणपती मंदिराची पौराणिक कथा खूप मनोरंजक आहे. या पवित्र मंदिराबद्दल असे म्हटले जाते की सुरुवातीला हे शिवाचे मंदिर होते, परंतु एके दिवशी वृद्धाच्या धाकट्या मुलाने भिंतीवर गणेशाची मूर्ती बनवली.
 
असे म्हणतात की मुलाने बनवलेली मूर्ती हळूहळू मोठी होऊ लागली आणि हळूहळू लोक गणेशाची पूजा करू लागले. तेव्हापासून या मंदिरात गणपतीच्या रूपात पूजा केली जाऊ लागली. त्यामुळे मधुर महागणपती मंदिरातील भिंतीवरून गणेशाचे दर्शन झाल्याचे या मंदिराविषयी सांगितले जाते.
 
तसेचमधुर महागणपती मंदिर स्थानीय लोकांसाठी खूप महत्वाचे आहे. मान्यताअनुसार हे मंदिर शहराचे रक्षण करते. तसेच इथे एक तलाव आहे त्याचे पाणी औषधी गुंणांनी परिपूर्ण आहे. गणेश चतुर्थी पर्वावर मधुर महागणपती मंदिरला भव्यदिव्य सजवले जाते. 
 
मधुर महागणपती मंदिर केरळ कसे जावे?
मधुर महागणपती मंदिरापर्यंत पोहोचणे सोपे आहे. यासाठी तुम्ही केरळमधील कोणत्याही शहरातून रेल्वे, बस किंवा टॅक्सी ने कासारगोड शहरा पर्यंत पोहोचू शकता. 7 किमी अंतरावर असलेल्या कासरगोड शहरातून स्थानिक टॅक्सी किंवा कॅबने मधुर महागणपती मंदिरापर्यंत पोहोचता येते.