सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

भारतातील मिनी स्वित्झर्लंड खजियार

हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या,लांब,सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेण्या आहे.एका बाजूस विंध्याचल,सातपुडाचे डोंगर,तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत, भारतामध्ये एका पेक्षा एक उत्तम पर्वत, पर्वतश्रेणी आणि सुंदर व मोहक खोऱ्या आहेत.चला जाणून घेऊ या खजियार हिल स्टेशन बद्दल जे भारतातील टॉप हिल स्टेशनपैकी एक आहे.
 
1 भारतातील हिमाचल राज्यातील चंबा आणि डलहौजी जवळील खजियार हे पर्यटकांसाठी एक अतिशय आकर्षक ठिकाण आहे. डलहौजीपासून सुमारे 24 कि.मी.अंतरावर या ठिकाणी फिरायला बरीच ठिकाणे आहेत. पश्चिम हिमालयातील भव्य धौलाधर पर्वताच्या पायथ्याशी सुंदर खजियार वसलेले आहे.
 
2 5 हजार चौरस फूट क्षेत्रात पसरलेला हा तलाव खजियार तलाव म्हणून ओळखला जातो. तलावाच्या मध्यभागी असलेल्या बेटावर बसून, आपण तासनतास निसर्गाच्या अनोख्या वारसा देणाऱ्या खजियारच्या सुंदरतेचा आनंद घेऊ शकता.
 
3 येथे एक नाग मंदिर देखील आहे ज्यात नागदेवतेची पूजा केली जाते. डोंगराच्याआर्किटेक्चरमध्ये बांधलेली ही दहावी शतकातील हे धार्मिक स्थळ खज्जी नागा मंदिरासाठी ओळखले जाते. मंदिराच्या मांडपाच्या कोपऱ्यात पाच पांडवांच्या लाकडी मूर्ती स्थापित केल्या आहेत.असे मानले जाते की पांडव त्यांच्या वनवासात येथे वास्तव्यास होते.या शिवाय शिव आणि हिडिंबा देवीचे  इतरही मंदिरे आहेत.
 
4 येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ असलेले सहा देवदाराचे समान उंचीचे वृक्ष पाच पांडव आणि सहावे वृक्ष द्रौपदीचे प्रतीक मानले जातात.
 
5 येथून एक किमी अंतरावर,कालटोप वन्यजीव अभ्यारण्यात ,13 समान उंचीच्या शाखा असलेल्या मोठ्या देवदार वृक्षाला 'मदर ट्री' म्हणून ओळखले जाते.
 
6 साहसी लोकांना डोंगरी पायथ्यावरुन फिरताना ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. पण इथे कधी एखाद्या प्राण्याशी सामना होईल हे सांगणे कठीण आहे.
 
7 हिरवागार झाडे झुडपे उंच देवदार आणि डोंगराच्या मध्ये वसलेले खजियरला भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. एप्रिल आणि मे च्या भीषण उकाड्यापासून सुटका हवी असल्यास इथे फिरायला अवश्य या.शांततेत बसून निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घ्या. उन्हाळ्याच्या हंगामात संध्याकाळी फिरताना थंड वार शरीराला आणि मनाला बेभान करत.खाजियारच्या सौंदर्य मुळे चंबाच्या तत्कालीन राजाने खजियार त्याची राजधानी म्हणून नेमली आहे. 
 
8 खजियार चंडीगडपासून 352 किमी आणि पठाणकोट रेल्वे स्थानकापासून 95 किमीअंतरावर आहे. जिल्हा कांग्रामधील गगल विमानतळापासून 130 कि.मी.अंतरावर आहे. हे दिल्लीपासून 560 किमी अंतरावर आहे.