बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (21:08 IST)

संपूर्ण नाशिक शहरात या दोन दिवशी पाणी पुरवठा नाही

Nashik mahapalika
शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. शहराच्या काही भागात येत्या शनिवारी आणि रविवारी (२१ व २२ मे) पाणी पुरवठा बाधित होणार आहे. त्याची नोंद घ्यावी, असे महापालिकेने कळविले आहे.
 
महापालिकेच्या पाणी पुरवटा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मनपाचे गंगापूर धरण रा. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ के. व्ही. सातपूर आणि) १३२ के. व्ही. महिंद्रा या दोन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ के. व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. तसेच मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के.व्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे.
 
महावितरणकडून ओव्हरहेड लाईन व सबस्टेशनची पावसाळापुर्व कामे करण्याकरिता शनिवार दि.२१/०५/२०२२ रोजी सकाळी ०९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपावेतो वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचा परिणाम या दोन्ही केंद्रांवर होणार आहे. त्यामुळे नाशिक पश्चिम व पंचवटी विभागामार्फत जलशुध्दीकरण केंद्रांकडे जाणारी अशुध्द पाण्याची मुख्य गुरुत्ववाहिनी गोदावरी नदीच्या उजव्या व डाव्या बाजूला दुरुस्त करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन नाशिक व सातपुर विभागामार्फत अशुध्द पाण्याची मुख्य गुरुत्ववाहीनी दुरुस्त करण्यात येणार आहे.
 
सदर दोन्हीही ठिकाणाहून होणारा पुर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवार दि. २१/०५/२०२२ रोजी बंद ठेवून उपरोक्त नमुद कामे करता येणे शक्य होणार आहे. तरी मनपाचे मनपाचे गंगापूर धरण व मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा शनिवार दि.२१/०५/२०२२ रोजीचा दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवार दि. २२/०५/२०२२ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे महापालिकेने कळविले आहे.