सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (12:54 IST)

पुढील चार दिवसात राज्यात विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

सध्या देशात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. सूर्य तापत आहे. कामाच्या निमित्ते नागरिकांना बाहेर पकडावे लागल्यावर उष्णतेच्या झळा जाणवत आहे. पुढील चार दिवस विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान खात्यानं वर्तवले आहे. 
 
असानी चक्रीवादळानंतर देशाच्या उत्तरेत तीव्र उष्णतेची  लाट आली आहे. देशाच्या राजधानीसह अन्य राज्यात अक्षरश: सूर्य आग ओखत असल्याने तेथील नागरिकांचे जनजीवर विस्कळीत झाले आहे. कडक उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही.

पुढचे चार दिवस विदर्भासह मराठवाडाया भागात उष्णतेची लाट (heat wave) येणार असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले होते. दरम्यान काल दिवसभरात विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट (heat wave) जाणवू लागली आहे. शनिवारी वर्धा जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक नोंदववण्यात आले. वर्ध्याचे तापमान शनिवारी 46.5 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मागील 24 तासांत तापमानात 2.5 अंशांची वाढ झाली आहे. तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक कमी 29.7 अंश तापमानाची नोंद झाली.
 
तज्ञानी म्हटले आहे की तीव्र उष्णतेने लहान मुले, वृद्ध आणि आजारांनी ग्रस्त लोकांसाठी आरोग्य  सांभाळावे लागणार आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, या भागातील लोकांनी उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. हलक्या रंगाचे सैल, सुती कपडे परिधान करावेत आणि डोक्याला कापड, टोपी किंवा छत्री इत्यादींनी झाकावे.पाणी भरपूर पिणे हे देखील त्यांनी सांगितलं आहे.