शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (10:07 IST)

लग्नाच्या जेवणातून 100 हुन अधिक जणांना विषबाधा

परभणीत लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली असून विषबाधामुळे  100 पेक्षा अधिक जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 15  मे रोजी दर्गा रोड पारवा गेट च्या मेहबूब फंक्शन हॉल येथे कलीम अन्सारी यांच्या मुलीचे लग्न होते. . 
लग्नांनंतर जेवणाचा कार्यक्रम सुरु झाला जेवणात नंतर काहीवेळाने 150 जणांना पोटदुखी ,मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या.
 
वेळीच त्यांना तातडीने परभणीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.आता सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले आहे. लग्नाचं  जेवण वऱ्हाडींना चांगलंच महागात पडलं आहे.