1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (08:38 IST)

नगर-मनमाड महामार्गावर अपघात; चार जण जागीच ठार, कारचा चुराडा

Accident on Nagar-Manmad highway; Four killed on the spot
अहमदनगरमध्ये  एक मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गावरील  गुहा फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
 
बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात कारचा पूर्ण चक्काचूर झाल्याचं दृष्यांमध्ये दिसत आहे. या अपघातामध्ये दोन महिला एक पुरुष आणि एका लहान बालकाचा अशा चार जणांचा मृत्यू झाला. एक महिला आणि आठ महिन्याच्या बाळाचा उपचाराला नेताना ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.कोपरगाव पाठोपाठ राहुरीत झालेल्या या भीषण अपघाताने जिल्हयात हळहळ व्यक्त केली जातेय.