शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (10:56 IST)

शेतकऱ्याला भाव मिळाला नाही , 200 क्विंटल कांदा मोफत वाटला

onion
शेतकऱ्याला राजा म्हणतात ह्याचे प्रत्यय आज पाहायला मिळाले बुलढाण्यात एका शेतकऱ्याने आपल्या उदारतेचा परिचय दिले आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने आणि उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेगावच्या गणेश पिंपळे नावाच्या शेतकऱ्याने हतबल होऊन आपला 200 क्विंटल कांदा अक्षरश: लोकांना फुकट वाटला. लोकांनी देखील मोफतचा कांदा घेण्यासाठी गर्दी केली होती. 
 
शेतकरी हा कष्ट करून आपल्या पिकाची जोपासना करतो. त्याला पीक वाढवण्यासाठी अस्मानी संकटाना समोरी जावे लागते.पीक वाढविण्यासाठी वर्षभर राबतो. त्याला अनेक अडचणींना सामोरी जावे लागते. तरीही सर्व संकटाना मात करून तो आपला तयार झालेला माल बाजारात विकण्यासाठी घेऊन जातो. पण जर त्या मालाला कवडी मोल किंमत मिळाल्यावर त्याच्या समोर काहीच पर्याय नसतो. तरीही त्याला बळीराजा किंवा शेतकरी राजा म्हणतात.

शेगावच्या एका शेतकरी राजाने आपल्या उदारतेच परिचय दिले आहे. गणेश पिंपळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गणेश यांनी आपल्या दोन एकरच्या शेतात कांद्याचं पीक लावले त्यात त्यांना सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च झाला. पीक देखील तयार झालं. आता या पिकाला चांगला भाव मिळणार अशा आशेने ते बाजारात माल विकायला घेऊन गेले. मात्र कांद्याला घेण्यासाठी कोणीच व्यापारी तयार झाले नाही. हवा तसा भाव कांद्याला मिळाला नाही त्यामुळे कांदा खराब होऊन वाया जाऊ नये. या साठी  शेतकऱ्याने आपल्या घराच्या जवळच्या लोकांना कांदे फुकट दिले आणि कांदा फुकटात घेऊन जा असे नागरिकांना आवाहन केले. मोफत मिळणाऱ्या कांदा घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली क्षणातच 200 क्विंटल कांदा मोफत वाटला. आता गणेश यांचे तब्बल अडीच लाखांचा नुकसान झालं असून ते कर्जबाजारी झाले आहे. पुढे काय करावं हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.