नागेश्वर मंदिर द्वारका
India Tourism : महाशिवरात्री ही भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. सर्व शिवभक्तांचा आवडता सण असलेली महाशिवरात्री काही दिवसांत आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर तुम्हाला देखील भगवान शिवाच्या दर्शनाची ओढ लागली असेल ना. या करिता आज आपण असे भगवान शिवांना समर्पित असे एक मंदिर पाहणार आहोत. ज्याचा संबंध नाग आणि नागीणशी आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर तुम्ही देखील या मंदिराला नक्कीच भेट देऊ शकतात.
भारतात भगवान शिवाची अनेक मंदिरे असली तरी, यातील काही मंदिरे खूप प्रसिद्ध आहे. यापैकी एक म्हणजे द्वारकेतील नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर होय.
नागेश्वर ज्योतिर्लिंगाची पौराणिक आख्यायिका-
नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. असे सांगतात की, तिथे दारुका नावाची एक राक्षसी मुलगी होती. दारुकाने माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी तपस्या केली आणि तिच्याकडून वरदान मागितले. दारुका माता पार्वतीला सांगते की मी वनात जाऊ शकत नाही, तिथे अनेक प्रकारची दैवी औषधे आहे. अशा परिस्थितीत, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आम्हा राक्षसांनाही त्या जंगलात जाऊन चांगले कर्म करण्याची परवानगी द्यावी. माता पार्वती दारुकाला वरदान देते आणि तिला त्या वनात प्रवेश करण्यास परवानगी देते. दारुका जंगलात जाऊ लागली आणि तिथे खूप कहर केला आणि देव-देवतांकडून त्या जंगलात जाण्याचा अधिकार हिसकावून घेतला. याशिवाय, दारुकाने शिवभक्त सुप्रियाला बंदिवान केले. दारुकाच्या अत्याचारांनी त्रस्त होऊन, सुप्रियाने भगवान शिवाची तपश्चर्या सुरू केली. सुप्रियाच्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिवासोबत एक अतिशय सुंदर मंदिर देखील दिसले ज्यामध्ये एक ज्योतिर्लिंग चमकत होते. सुप्रियाने भगवान शिव यांना राक्षसांचा नाश करण्यास सांगितले आणि त्याच ठिकाणी स्थायिक होण्यास सांगितले. भगवान शिवाने दारुकासह सर्व राक्षसांचा नाश केला आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात तेथे स्वतःची स्थापना केली.
नागेश्वर मंदिर का प्रसिद्ध आहे?
हे नागेश्वर मंदिर गुजरातमधील द्वारका नाथ धामपासून १७ किलोमीटर अंतरावर आहे. धार्मिक मान्यतेनुसार, देवी पार्वती आणि भगवान महादेव या मंदिरात नाग आणि नागाच्या रूपात प्रकट झाले होते, म्हणूनच याला नागेश्वर मंदिर म्हणतात. भारतात भगवान शिवाची एकूण १२ ज्योतिर्लिंगे आहे, त्यापैकी दारुक जंगलात असलेले हे ज्योतिर्लिंग १० व्या स्थानावर आहे.
नागेश्वर ज्योतिर्लिंग जावे कसे?
विमान मार्ग- मंदिरापासून जामनगर विमानतळ 137 किमी अंतरावर आहे. येथून खासगी वाहन किंवा टॅक्सीच्या मदतीने किंवा बस ने नागेश्वर ज्योतिर्लिंगापर्यंत सहज पोहचता येते.
रेल्वे मार्ग-मंदिरापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन द्वारका आहे. येथून रिक्षा किंवा टॅक्सीच्या मदतीने नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पोहचता येते.
रस्ता मार्ग-जामनगर आणि अहमदाबाद रस्त्यावर नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. तसेच नागेश्वर ज्योतिर्लिंगासाठी अहमदाबाद आणि जामनगर येथून थेट बसेस उपलब्ध आहे.