शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (14:38 IST)

साई बाबा मंदिर अजमेर

अजमेर येथील अजय नगर येथे प्रसिद्ध साई बाबा मंदिर आहे. हे मंदिर 1999 मध्ये गरीब नवाज शहरातील रहिवासी सुरेश लाल यांनी बनवले होते. हे मंदिर अजमेरच्या लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते आणि वास्तूनुसार अजमेरच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. सर्व साई बाबा भक्तांसाठी हे अतिशय लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे.
 
इतिहास 
आधुनिक युगात बांधलेले साई बाबा मंदिर 1999 मध्ये गरीब नवाज शहरातील रहिवासी सुरेश के लाल यांनी बनवले होते. जे सुमारे पाच बिगा किंवा दोन एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर बांधले गेले.
 
वास्तुकला 
मंदिर संगमरमर दगडाने बांधले गेले असून पारभासी दगडाची वैशिष्ट्यपूर्ण कलाकारी बघायला मिळते. 
 
दर्शन वेळ 
साई बाबा मंदिर भक्तांसाठी सकाळी 6.00 वाजेपासून ते संध्याकाळी 8.00 वाजेपर्यंत उघडं असतं.
 
योग्य काळ 
अजमेरला जाण्याचा उत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते मार्च असा मानला जातो. कारण यावेळी हवामान आनंददायी आहे, जे आपल्या सहलीला रोमांचक करते आणि आपण सहजपणे मंदिरास भेट देऊ शकता. उन्हाळ्याच्या काळात येथे भेट देण्याचा सल्ला दिला जात नाही कारण यावेळी जोरदार उष्णता जाणवते, आणि तापमान 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते, ज्यामुळे आपल्याला अजमेरला जाण्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
 
साई बाबा मंदिर अजमेर भोवती सर्वोत्तम पर्यटन स्थळे
अजमेर शरीफची मजार
अनासागर तलाव
अढ़ाई दिन का झोपड़ा
अकबर पॅलेस आणि संग्रहालय
नरेलीचे जैन मंदिर
क्लॉक टॉवर 
दुर्गाबाग गार्डन
फॉय सागर लेक
किशनगड शहर
सोनी जी की नसियां
तारागढ़ किला बूंदी
अब्दुल्ला खान मकबरा
पृथ्वीराज चौहान स्मारक
अकबरी मशीद
मेयो कॉलेज संग्रहालय
अकबरी किल्ला
फोर्ट मसूदा
सांभर तलाव
शहीद स्मारक
किशनगड किल्ला

प्रसिद्ध भोजन
डाळ बाटी चूरमा, घेवर, बाजरी खिचडी, राजस्थानी पुलाव आणि गट्टे भाजी. याशिवाय लाल मास, चिकन / मटण करी, चिकन / मटन बिर्याणी आणि सुला कबाब यासारख्या प्रसिद्ध नॉन-वेज आयटम देखील येथे मिळतात. संध्याकाळच्या वेळी स्थानिकांसाठी सर्वात सामान्य नाश्ता म्हणजे कचोरी कढी आणि अजमेरमधील प्रसिद्ध सोहन हलवा. कबाब आणि तंदुरी नॉन-व्हेज सारख्या पदार्थांसाठी लोक दर्गा बाजारात जातात. याशिवाय अजमेरमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या वस्तूही मिळतील.
 
कसे पोहचाल 
साई बाबा मंदिर अजमेर शहरातील एक प्रमुख पर्यटन आणि धार्मिक स्थळ आहे, जिथे आपण बस, ट्रेन किंवा विमानाने अजमेरला पोहोचू शकता. येथून मंदिरात जाण्यासाठी आपण टॅक्सी / ऑटो घेऊ शकता.