थायलंडचा ताजमहाल ''व्हाइट टेंपल''
Thailand Tourism : भारतातील आग्रा येथील ताजमहालच्या सौंदर्याबद्दल सर्वांना माहिती आहे. तसेच दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्याला भेट देतात. पण आज आपण एका मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला थायलंडचा ताजमहाल म्हणतात.
थायलंडमधील चियांग रायपासून किमान तीन तासांच्या अंतरावर एक पांढरे शुभ्र असे मंदिर आहे. ज्याला थायलंडचा ताजमहाल म्हणतात. हे मंदिर खूप मोठे आहे, तसेच हे मंदिर व्हाईट टेंपल म्हणून देखील ओळखले जाते. या टेंपलच्या भोवती एक तलाव, कारंजे आणि अनेक प्रतिमा आहे. हे मंदिर "नरक" आणि "स्वर्ग" मधील फरक दाखवते.
तसेच या मंदिराची खास गोष्ट म्हणजे स्वर्ग आणि नरकातील फरक स्पष्ट करण्यासाठी येथे देव आणि राक्षसांच्या अनेक आकृत्या बनवण्यात आल्या आहे. येथील राक्षसांचे प्रचंड पुतळे खूप भयानक दिसतात.
व्हाईट टेंपलमध्ये काय खास आहे?
व्हाइट टेंपलमध्ये भगवान बुद्धांची एक मोठी मूर्ती आहे. याशिवाय, या मंदिरात देव आणि राक्षसांच्या अनेक प्रतिमा देखील आहे. मंदिराच्या आतील प्रत्येक भिंतीवर अद्भुत कलाकृती करण्यात आल्या आहे. तसेच या मंदिराच्या आत फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे.
पांढऱ्या दगडांपासून बनवलेल्या या मंदिराला थायलंडचा ताजमहाल म्हटले जाते. पण प्रत्यक्षात याचा आणि आग्रा येथील ताजमहालचा काहीही संबंध नाही. तसेच या व्हाईट टेंपलला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक थायलंड मध्ये दाखल होत असतात.