बुधवार, 26 फेब्रुवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (07:30 IST)

रुद्रप्रयाग येथील त्रियुगीनारायण मंदिर जिथे शिव-पार्वतीने घेतले होते सप्तपदी

Triyuginarayan
India Tourism : आज महाशिवरात्री असून संपूर्ण भारत वर्षात हा सण मोठ्या धार्मिकतेने, श्रद्धेने, उत्साहात साजरा केला जातो. तसेच भारत देशातील असे एक मंदिर जिथे भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आणि ते मंदिर म्हणजे रुद्रप्रयाग मधील त्रियुगीनारायण मंदिर होय. आज देखील या ठिकाणी जळणारा अग्निकुंड देखील याचे प्रतीक मानला जातो. भारतात भगवान शिवाची असंख्य मंदिरे आहे आणि प्रत्येकाची स्वतःची कथा आणि रहस्य देखील आहे. तसेच रुद्रप्रयागमध्ये असलेले भगवान शिवाचे एक अद्वितीय मंदिर अशाच रहस्यांनी भरलेले आहे. या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की भगवान शिव यांनी या ठिकाणी माता पार्वतीसोबत सप्तपदी घेतले होते. 
त्रियुगीनारायण मंदिर इतिहास- 
भोलेनाथाच्या या मंदिरावर लोकांची खूप श्रद्धा आहे. तसेच वर्षभर, देश-विदेशातून लोक शिवजींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. इतकेच नाही तर जोडपी येथे लग्न करण्यासाठी देखील येतात, जेणेकरून त्यांना भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळेल. भगवान शिवाच्या या खास मंदिराचे नाव त्रियुगीनारायण आहे, जे उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ ब्लॉकमध्ये आहे. असे मानले जाते की हे मंदिर त्रेता युगात स्थापित झाले होते. एवढेच नाही तर हे मंदिर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी देखील विशेष जोडलेले आहे.
shiv parvati
त्रियुगीनारायण मंदिर पौराणिक आख्यायिका- 
देवी पार्वती ही राजा हिमावतची कन्या होती आणि तिला भोलेनाथ पती म्हणून हवे होते. यासाठी माता पार्वतीनेही कठोर तपस्या केली. यानंतर भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वतीशी विवाह केला. त्रियुगीनारायण मंदिरातच भगवान शिव आणि माता पार्वती यांनी सात फेरे घेतले अशी आख्यायिका आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू देवी पार्वतीच्या भावाच्या रूपात शिव-पार्वतीच्या विवाहाला उपस्थित होते आणि सर्व विधींचे पालन करत होते. या काळात ब्रह्माजी पुजारी बनले. म्हणून, लग्नाचे ठिकाण ब्रह्मशिला म्हणूनही ओळखले जाते, जे त्रियुगीनारायण मंदिराच्या अगदी समोर आहे.
असे म्हटले जाते की लग्नापूर्वी येथे देवी-देवतांच्या स्नानासाठी तीन पाण्याचे तलाव बांधण्यात आले होते, जे रुद्र कुंड, विष्णू कुंड आणि ब्रह्मकुंड म्हणून ओळखले जातात. तसेच पुराणानुसार, त्रियुगीनारायण मंदिर त्रेता युगापासून अस्तित्वात आहे. पौराणिक कथेनुसार, याच ठिकाणी भगवान विष्णूने वामन अवतार घेतला होता. म्हणून, या ठिकाणी भगवान विष्णूची वामन देवतेच्या रूपात पूजा केली जाते.