मलेशियातील तांजुंग बिदारा अनोखा समुद्र किनारा
तांजुंग बिदारा हे मलेशियातील मलक्काचा सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे जो पर्यटकांप्रमाणेच स्थानिक लोकांचाही अतिशय आवडता आहे. या समुद्र किनार्यावर काही उपहारगृहही आहेत. ज्यात असलेल्या स्पामद्ये आपण आपला थकवा दूर करू शकतो. इथल्या एका उपहारगृहाबाहेर एक संगीतमय करांजंही आहे. संगीताच्या तालावर नाचणार्या या कारंजाच्या जलधारा पाहून मन प्रसन्न होतं.
मलक्कात खाडीच्या काठावर एक नवीन वोटर फ्रंट तयार केला जात आहे. येथे 12 कोटी रुपये खर्च करून एक अत्याधुनिक भव्य मशीद बनवली आहे. तिचं नाव आहे, मशीद सेलात मलक्का. इते कापांग क्लिंग नावाची एक जुनी मशीदही आहे. जी इ.स. 1748 मध्ये बांधली गेली आहे. दुरुन पाहता ती एखाद्या चिनी पैगोडाप्रमाणे भासते.
मलक्काचं आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे एअर केरोह पार्क. ज्यात मोठ्या काळजीपूर्वक छोटा मलेशिया बनलेला आहे. यात आपल्याला या देशाच्या सर्व 13 राज्यातील वेगवेगळ्या पद्धतीची घरं पहायला मिळतात. लघू मलेशियाच्या जवळच मलक्काची प्रसिद्ध फुलपाखरांची बाग आहे. आय ऑफ मल्लका सुद्धा या शहराचं प्रमुख आकर्षण आहे. हे जगातील सर्वात उंच चक्र आहे. या चक्रातून बारा मिनिटं वरखाली फिरताना मलक्का शहराचं मनमोहन दर्शन होतं.