गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Modified: रविवार, 23 जानेवारी 2022 (10:17 IST)

हिन्दू हृदय सम्राट श्री बाळा साहेब ठाकरे एक प्रभावी व्यक्तिमत्व

बाळासाहेब ठाकरे फक्त हे नाव जरी मनात आले की एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली आपल्या कणखर भाषा, महाराष्ट्रातील शिवसेनेचे संस्थापक, राजकारणी, कुशल व्यंगचित्रकार, "सामना" या पत्रिकेचे संस्थापक, संपादक, आणि प्रभुत्व शैली असणारे व्यक्तिमत्त्व डोळ्या पुढे येतं.   
 
शिवसेनेचे प्रमुख हिन्दू हृदय सम्राट श्री बाळ केशव ठाकरे (बाळासाहेब ठाकरे ) यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे हे समाजसुधारक आणि लेखक होते. ह्यांचा आईचे नाव रमाबाई केशव ठाकरे होते. 
 
महाराष्ट्रामधील सर्व मराठी लोकांना एकत्र करण्यासाठी संयुक्त मराठी आंदोलनात त्यांनी प्रमुख   भूमिका बजावली. त्यांनी 1950 च्या काळात मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनविण्यासाठी अनेक कार्य केले.
बाळासाहेबांचे लग्न मीना ठाकरे यांच्याशी झाले होते. ह्यांना 3 अपत्ये प्राप्त झाली. बिंदूमाधव, जयदेव आणि उद्धव ठाकरे. बाळासाहेबांनी उपजीविकेसाठी बॉम्बे फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून नोकरी केली. काही काळापश्चात त्यानी नोकरीतून राजीनामा देऊन भावांसोबत स्वतःचे व्यंगचित्र साप्ताहिक 'मार्मिक' सुरू केले.
 
ह्यांचे वडील त्या काळातील समाज सुधारक आणि लेखक होतेच त्याबरोबर ते आजीविकेसाठी टायपिंगचे काम करायचे. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला इजा झाली. मातोश्री मध्ये राहण्याच्या आधी बाळासाहेब कुटुंब दादरच्या एका चाळीत "मिरांडात" राहत होते. मराठी वर्गाला जागृत करण्यासाठी त्यांनी आपल्या मार्मिक साप्ताहिक पत्रिकेत लिखाण केले.  बाळासाहेबांची कणखर आवाज आणि वक्तव्यं मराठी तरुणांची मने हादरवून टाकायची.     
 
19 जून 1996 साली बाळासाहेबांनी महाराष्ट्रात सकाळी 9:30 ला फक्त 18 माणसांच्या उपस्थितीत शिवसेना म्हणून कट्टर हिंदू-राष्ट्र-न्यायालयीन संस्थेची स्थापना केली. सुरुवातीचा काळ शिवसेनेसाठी काही चांगला नव्हता पण वेळ सरता सरता शिवसेना सत्तेत आली. पक्ष स्थापनेच्या 4 महिन्यानंतर साहेबांनी आपल्या मार्मिक साप्ताहिक पत्रातून जाहीर केले की शिवसेनेची पहिली सभा दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथे होणार आहे. सभेसाठी ही जागा योग्य नसल्याचे काहींनी त्यांना सुचवले पण पहिल्याच सभेत लोकांची अफाट गर्दी झाल्याने शिवाजी पार्क पण कमी पडले. त्यांच्या पहिल्याच सभेत जमलेल्या प्रेक्षक वर्गात प्रचंड उत्साह होता. 1995 साली भाजप-शिवसेना युती होऊन महाराष्ट्रात नवी सरकार आली. बाळा साहेब यांचे उग्र विचार आणि वक्तव्यांमुळे प्रसिद्ध होते.  
 
23 जानेवारी, 1989 रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सुरू झाले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन केले गेले. सामना मुंबईतून प्रसिद्ध झाले. सुरुवातीच्या काळात सामनामध्ये फक्त व्यंगचित्र प्रकाशित होत होते. काळानंतर हे शिवसेनेचे मुखपत्र बनले. प्रकाशनाच्या प्रसंगी बोलताना बाळासाहेबांचे वक्तव्य होते "हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचारासाठी आणि दररोजच्या होणाऱ्या आरोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सामना हे शस्त्राचे काम करेल. सामना हे राज्यकर्त्यांसाठी त्यांना दाखवणारा आरसा आहे. त्यात आपल्याला बघून सुधारण्याचा प्रयत्न करावा. सामना वृत्तपत्राची भाषा असभ्य असल्याने लोकांना टोचेल, तिखट असेल, पण लोकांनी वाचताना त्यातील दिलेल्या विषयाचे गांभीर्य समजावे. त्या काळात दैनिक ‘सामना’  वृत्तपत्र निघाल्यावर सर्व वृत्तपत्राच्या सृष्टीत हादरा बसून एकाएकी खळबळ आणि धांदल उडाली. आज देखील शिवसेनेचे निर्भीड मुखपत्र अशी "सामना"ची ओळख आहे.  
 
बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व वाघासारखे होते. ते आपल्या चांदीच्या सिंहासनावर बसून आपल्या विरोधकांना उघडपणे धमक्या देत होते. त्यांना लोकं भेटावयास त्यांचा निवासस्थानी मातोश्री ला जायचे. त्यांचे म्हणणे होते की ज्यांना मला भेटावयाचे आहे ते मातोश्रीला येऊ शकतात.  
 
बाळासाहेब ठाकरेंची विशेष गोष्ट म्हणजे ते कधीही कोणाला स्वत:हून भेटले नाहीत. ज्यांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे त्यांनी घरी यावे, असे त्यांचे मत होते. भारतातील सर्व महान हस्ती त्यांना भेटण्यासाठी मातोश्री, मुंबई येथे त्यांच्या घरी यायचे. बॉलीवूडमधील भलेमोठे कलाकार त्यांच्या घरी भेटण्यासाठी यायचे.
 
 गळ्यात रुद्राक्षाची माळ, कणखर आवाज असे त्यांचे वैशिष्ट्य होते. बाळासाहेबांनी कधीही निवडणूक नाही लढवली. ते नेहमीच देशाच्या भल्यासाठी लढायचे.  
 
बाळासाहेबांना 25 जुलै 2012 रोजी श्वासोच्छ्वासाचा त्रासासाठी मुंबईतील लीलावती हॉस्पिटल दाखल करण्यात आले. 14 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांची तब्येत खालावली. डॉक्टरांनी त्यांचा घरी मातोश्री वरचं त्यांना औषधोपचार द्यायला सुरू केले. पण त्यांच्या हाती अपयश आले. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेबांनी जगाचा निरोप घेतला.  शिवाजी मैदान येथे राजकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा अंत्ययात्रेत अफाट जन समुदाय आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी एकत्रित झाला होता.