मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Modified शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (09:43 IST)

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, ज्यांच्यावर लोक दगडफेक, शेण आणि चिखल फेकत होते

भारतातील महिलांना कधीच पुरुषाच्या समान दर्जा मिळाला नाही. तरी जर आपण 18 व्या शतकाबद्दल बोललो तर त्या काळातील महिलांचा संघर्ष समजू शकतो. त्या काळात स्त्रियांना शाळेत जाणे हे पाप मानले जात असे. अशा काळात सावित्रीबाई फुले यांनी जे काही केले ते काही सामान्य कामगिरी नाही. त्या शाळेत जात असताना लोक त्यांच्यावर दगडफेक करायचे. हे सर्व असूनही, त्या कधीही आपल्या ध्येयापासून विचलित झाल्या नाहीत.
 
सावित्रीबाई ज्योतिराव फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे पती ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्यासह महिलांच्या हक्कांसाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. सावित्रीबाई एक मराठी कवयित्री तसेच समाजसुधारक होत्या. त्यांना आधुनिक मराठी कवितेचे अग्रदूत मानले जाते. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाईंनी त्यांच्या पतीसह 1884 मध्ये महिलांसाठी एक शाळा उघडली.
 
महिला आणि समाजात समानता आणण्यासाठी सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांनी आयुष्यभर महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. आज त्या भारतीय स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखल्या जातात.
 
वयाच्या नवव्या वर्षी लग्न झाले होते
सावित्रीबाईंचा जन्म 1831 मध्ये महाराष्ट्रातील नायगाव या छोट्या गावात झाला. त्या जश्या जश्या मोठ्या होत गेल्या तश्या तश्या त्यांची स्वप्ने मोठी होत गेली. स्वप्ने मोठी होती एवढेच नाही तर त्यांचे हेतूही मजबूत होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी झाले. लग्नानंतर त्या लवकरच आपल्या पतीसह पुण्यात आल्या. लग्नाच्या वेळी त्यांचे शिक्षण झाले नव्हते. पण त्यांचे मन अभ्यासाकडे वळत होते. त्यांचे वाचन आणि शिकण्याच्या उत्कटतेने प्रभावित होऊन त्यांच्या पतीने त्यांना पुढे वाचायला आणि लिहायला शिकवले. सावित्रीबाईंनी अहमदनगर आणि पुण्यात शिक्षिका होण्याचे प्रशिक्षण घेतले आणि पात्र शिक्षिका झाल्या.
 
लोक दगडं आणि शेण फेकायचे
त्यांचा शिक्षिका होण्याचा प्रवासही तितका सोपा नव्हता. त्या काळात मुलींसाठी शाळेत जाणे हे पापापेक्षा कमी नव्हते. त्या शाळेत जाताना लोक त्यांच्यावर दगड फेकायचे. त्यांच्या अंगावर शेण देखील फेकत असत. यामुळे त्यांचे कपडे गलिच्छ व्हायचे. ह्याला सामोरे जाण्यासाठी त्या सोबत एक अजून साडी घेऊन जात होत्या आणि शाळेत पोहचल्यावर तिथे कपडे बदलत असे. इतका त्रास होऊनही त्यांनी आपलं ध्येय सोडले नाही आणि अभ्यास चालू ठेवला.
 
समाजात समानता हे त्यांचे ध्येय होते
भारतातील विधवांच्या दुर्दशेमुळे सावित्रीबाईंना मोठे दु: ख झाले. म्हणून 1854 मध्ये त्यांनी विधवांसाठी निवारा उघडला. वर्षानुवर्षे सतत सुधारणा केल्यानंतर 1864 मध्ये त्या याला एका मोठ्या आश्रयामध्ये रूपांतरित करण्यात यशस्वी झाल्या. निराधार महिला, विधवा आणि बाल सुना ज्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सोडून दिले होते त्यांना या निवारा गृहात जागा मिळू लागली. त्या सर्वांना सावित्रीबाई शिकवायच्या. त्यांनी या संस्थेत अवलंबून असलेल्या विधवेचा मुलगा यशवंतरावांनाही दत्तक घेतले. त्या वेळी दलित आणि निम्न जातीच्या लोकांना विहिरीचे पाणी घेण्यासाठी सामान्य गावांमध्ये जाण्यास मनाई होती. यामुळे त्यांना आणि त्यांच्या पतीला खूप त्रास झाला. म्हणून त्यांनी आपल्या पतीसह विहीर खोदली जेणेकरून त्या लोकांनाही सहज पाणी मिळेल. त्यावेळी त्याच्या या चालीला खूप विरोध झाला.
 
ब्रिटिश सरकारने सन्मानित केले
त्या पतीच्या सत्यशोधक समाजाच्या संस्थेसाठी सतत काम करत होत्या. याद्वारे त्यांना समाजात समानता आणायची होती. 1873 मध्ये, सावित्रीबाईंनी सत्यशोधक विवाहाची प्रथा सुरू केली, ज्यात पती -पत्नीला शिक्षण आणि समानतेची शपथ देण्यात आली. असे नाही की त्यांच्या या कृती कोणीच पहात नव्हते. 1852 साली ब्रिटिश सरकारने सावित्रीबाई फुले यांना राज्यातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून घोषित केले. 1853 मध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल सरकारने त्यांचे कौतुक केले.
 
स्वतः पतीचे अंतिम संस्कार केले
त्यांचे पती ज्योतिराव 1890 मध्ये मरण पावले. सर्व सामाजिक निकष मागे ठेवून, त्यांनी पतीचे अंतिम संस्कार केले आणि त्यांच्या चितेला अग्नी दिली. त्यांनी ज्योतिरावांचा वारसा पुढे चालवला आणि सत्यशोधक समाजाच्या प्रमुख झाल्या.
 
प्लेगने जीव घेतला
1897 मध्ये प्लेग संपूर्ण महाराष्ट्रात पसरला. या आजाराचे दुखणे त्या बघू शकल्या नाही आणि प्रभावित भागात मदतीसाठी बाहेर पडल्या. त्यांनी हडपसर, पुण्यात प्लेगने ग्रस्त रुग्णांसाठी क्लिनिकही उघडले. त्या 10 वर्षांच्या प्लेगने त्रस्त मुलाला सोबत घेऊन रुग्णालयात जात होत्या. त्या दरम्यान त्यांना देखील प्लेगची लागण झाली. या प्लेग रोगामुळे त्यांनी 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
प्रेरणास्त्रोत
त्यांने जीवन आणि कार्य भारतीय समाजातील सामाजिक सुधारणा आणि महिला सक्षमीकरणाच्या दाखल्यासारखे आहे. त्या आजही अनेक महिला हक्क कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.