रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (08:02 IST)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सी-मेट यांच्यात सामंजस्य करार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सेन्टर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी (सी-मेट) यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आला.या करारानुसार विद्यार्थी व प्राध्यापकांचे संशोधन कार्यक्षेत्र वाढणार आहे.या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व  सी-मेट हे मागील 25 वर्षांपासून एकत्र काम करत आहे. या करारामुळे याला अधिक मूर्त रूप येण्यास मदत झाली आहे. या कराराच्या माध्यमातून समान कार्यक्षेत्रात एकत्रित संशोधन करणे शक्य होणार आहे.तसेच अध्यापन,अध्ययन,संशोधनासाठी लागणारे साहित्य आदींची देवाण घेवाण होणार आहे.स्कूल ऑफ फिजिक्स,स्कूल ऑफ केमिस्ट्री,स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आणि अन्य संबंधित विभागांतील विद्यार्थ्यांना यामुळे अधिक सखोल अभ्यास करण्यास मदत होणार आहे.