गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:39 IST)

शहरात 892 सक्रिय रुग्ण, 183 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज, 164 नवीन रुग्णांची नोंद

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 164 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची मंगळवारी नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 183 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आजमितीला एकूण 892 सक्रिय रुग्ण आहेत.
 
शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 65 हजार 5 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 892 सक्रिय रुग्ण शहरात आहेत.त्यातील 216 रुग्ण गृहविलगीकरणात असून 676 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 45 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 428 आहेत.आज दिवसभरात 10 हजार 629 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.आजपर्यंत 11 लाख 27 हजार 754 जणांनी लस घेतली.