मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:26 IST)

पुणे जिल्ह्यात डेल्टा प्लसचे दोन रुग्ण आढळले

Two Delta Plus patients were found in Pune district Maharashtra News Pune News Coronavirus News In Marathi Webdunia Marathi
पुणे जिल्ह्यात डेल्टा प्लसचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा इथे कोरोनाचा डेल्टा प्लस विषाणू आढळून आला आहे.दोन रुग्णांना या विषाणूची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.14 वर्षांचा मुलगा आणि 40 वर्षीय व्यक्तीला या विषाणूची बाधा झाली आहे. दोन्ही रुग्णांची तब्येत चांगली आहे.लोकांनी याबाबत घाबरून जाऊ नये असं आवाहन,आरोग्य विभागानं केलं आहे. 
 
एकूण 25 व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या.यापैकी 14 वर्षांचा मुलगा आणि 40 वर्षांच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचं अहवालातून समोर आलं.यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झालं असून रुग्णांच्या परिसरातील लोकांचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.लोकांनी प्रशासनाला सहकार्य करून आजारी रुग्णांची तपासणी करून घ्यावी असं आवाहन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं आहे.