शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (23:14 IST)

महाराष्ट्राचे संत आडकोजी महाराज मराठी माहिती

संत आडकोजी महाराजांचा जन्म कसबा येथे कासार कुळात 14 नोव्हेंबर 1821 रोजी मध्ये आर्वी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिवराव फिसके होते. आडकोजी महाराज लहानपणापासूनच कलंदर वृत्तीचे होते. त्यांचे लग्न त्यांच्या  कुटुंबीयांनी लावून  दिले. मात्र त्यांना वैवाहिक जीवनात रस नसल्यामुळे वयाच्या चाळीसाव्या वर्षांपासून विरक्त झाले. मौनात चिंतन करणे त्यांना वाड्याचे  आणि तशी त्यांची प्रवृत्ती होती. त्यांच्या अध्यात्मिक गुरु संत मायबाई होत्या. त्यांच्या आदेशानुसार आडकोजी महाराज विदेहीअवस्थेत वरखडे आले.  त्यांनी लोकांसाठी लोकहितासाठी अनेक  चमत्कार केले . त्यांचे भक्त त्यांच्या खाण्यापिण्याचे लक्ष ठेवायचे .त्यांना वस्त्राचे भान देखील नसे. भक्त आपल्या गुरूंची काळजी घेत असे.  ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु होते.तुकोडी महाराजांची आई आडकोजी महाराजांच्या दर्शनास गेले असता त्यांनी तुकडोजी महाराजांना आडकोजी महाराजांच्या पदरी टाकले आणि अशा प्रकारे आडकोजी महाराज तुकडोजी महाराजांचे गुरु झाले. आडकोजी महाराजांनी समाजात आध्यात्मिकतेचा प्रसार केला. आडकोजी महाराजांनी वयाच्या शंभराव्या दिवशी श्री क्षेत्र वरखेड या ठिकाणी जिवंत समाधी घेतली. हे दुसरे संत होते ज्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या नंतर जिवंत समाधी घेतली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्यांचे गुरु आडकोजी महाराज या गुरु शिष्याची जोडी प्रख्यात आहे. 
 
 
Edited By - Priya Dixit