Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संत तुकाराम महाराज

Updated: गुरूवार, 11 जून 2020 (21:14 IST)
 
संत तुकारामाची भाव कविताच अभंग होय. त्यांचे अभंग आजही लोकप्रिय असून खेड्यातील अशिक्षितांना नित्य पाठात आहे.  

आजही अभंगाची लोकप्रियता वाढतच आहे. हे भागवत धर्माचे कळस होते. त्यांचा अभंगात परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्राचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांचा काव्यातील गोडवा व भाषा रसाळ आहे.  
 
संत तुकाराम महाराजांनी आपलं गवळणीही रचल्या. पुण्याजवळ वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांनी संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेतून सांगितल्या बद्दल शिक्षेस्वरूप त्यांना त्यांचे सर्व अभंगाच्या गाथा इंद्रायणीत बडूवून द्यायला सांगितले. तुकोबांनी स्वहस्ते दगडाला सर्व वह्या बांधून पाण्यात बुडवल्या. तुकोबांना असह्य दुःख झालं. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला तेव्हा तेराव्या दिवशी भगवंताच्या कृपेने सर्व वह्या पाण्यावरती आल्या व तरंगू लागल्या.
 
फाल्गुन वद्य द्वितीयेला इ. स. 1650  महाराष्ट्रातील देहू येथे तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले. हा दिवस म्हणजे तुकाराम-बीजेचा होय.  

तुकाराम महाराज सांसारिक असूनही त्यांचे संपूर्ण आयुष्य परमार्थाकडे वळले. कर्जदारांचे कर्जमाफी करणारा हा जगातील पहिला संत होय. महात्मा बुद्धाने राजेश्वर्याचे त्याग केले तसेच तुकारामांनी संसारातील सुख दुःखाचा त्याग केला.  
 
मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञानज्योत संत ज्ञानेश्ववरांनी प्रज्वलित केली. ज्ञानेश्वर हे धर्म-क्रांतीचे पहिले संत होते. ज्ञानेश्वरांनंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकविला. त्या काळी बहुजन समाजामध्ये धर्म-कर्मकांडाची जळमटे पसरत होती. ती जळमटे तुकारामांनी आपल्या कीर्तनातून पुसली. ह्यांची अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात वसली. आपल्या अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला दिली. यांचे अभंग आजही गर्जत आहे.
 
 
संत तुकाराम यांचे काही अभंग....
 
आम्ही किंकर संतांचे दास। 
संत पदवी नको आम्हांस।।’ 
 
‘नरस्तुती आणि कथेचा विकरा।
 हें नको दातारा घडों देऊ ।।
 
दिवटय़ा, छत्री, घोडे। हें तों बऱ्यांत न पडे।।
आतां येथे पंढरीराया। मज गोविसी कासया।।
 
मान दंभ चेष्टा। हें तो शूकराची विष्ठा।।’
‘तुमचें येर वित्त धन। तें मज मृत्तिकेसमान।।
कंठी मिरवा तुळसी। व्रत करा एकादशी।।’
 
‘कीर्तनाचा विकरा मातेचें गमन।
भाड खाई धन विटाळ तो।।
 
हरिभक्ताची माता हे हरिगुणकीर्ति।
इजवर पोट भरिती चांडाळ ते।।
 
अंत्यज हा ऐसें कल्पांतीं करीना।
भाड हे खाईना जननीची।।
 
तुका म्हणे त्यांचें दर्शन ही खोटें।
पूर्वजासि नेटें नरका धाडी।।’
 
‘उभ्या बाजारांत कथा। हें तों नावडे पंढरीनाथा।।
अवघें पोटासाठीं सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।।
 
लावी अनुसंधान। कांहीं देईल म्हणवून।।
काय केलें रांडलेंका। तुला राजी नाहीं तुका।।’
 
‘जेथें कीर्तन करावें। तेथे अन्न न सेवावें।।
बुका लावूं नये भाळा। माळ घालूं नये गळां।।
 
तट्टावृषभासी दाणा। तृण मागों नये जाणा।।
तुका म्हणे द्रव्य घेती। देती तेही नरका जाती।।’
 
‘कथा करोनियां द्रव्य देती घेती।
तयां अधोगति नरकवास।।’
 
‘कथा करोनियां मोल ज्यापें घेती।
तेही दोघे जाती नरकामध्यें।।’
 
‘म्हणवितां हरिदास कां रे नाहीं लाज।
दीनासी महाराज म्हणसी हीना।।
 
काय ऐसें पोट न भरेसें झालें।
हालविसी कुले सभेमाजीं।।’
 
आतां तरी पुढे हाचि उपदेश।
नका करूं नाश आयुष्याचा।।
 
सकळांच्या पायां माझें दंडवत।
आपुलालें चित्त शुद्ध करा।।’
बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.. पंढरीनाथ महाराज की जय....

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, सरकारने दुसरा पर्याय नसल्याचे सांगितल्याने जरांगे पाटील यांना मोठा धक्का

चीनमध्ये गावात भूस्खलन, १२ जणांचा मृत्यू

रिल्स बनवणे महागात पडले; ड्रोनने चित्रीकरण करणाऱ्या चार तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली

पुण्यातील कोंढवा येथे जुन्या वैमनस्यातून गुन्हेगारांनी गोळीबार केला; १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

LIVE: पुण्यातील कोंढवा येथे जुन्या वैमनस्यातून गुन्हेगारांनी गोळीबार केला

पुढील लेख
Show comments