1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: सोमवार, 11 मे 2020 (08:26 IST)

आषाढी एकादशी - निवडक मंडळींनी ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन जावं असा प्रस्ताव

पंढरपूरच्या आषाढी वारीची परंपरा सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं पूर्णपणे रद्द करू नये, तर काही निवडक मंडळींनी ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जावं असा प्रस्ताव दिंडी प्रमुख आणि वारकऱ्यांनी तसंच आळंदीवासी यांनीही सादर केला आहे.
 
आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच ३० जून रोजी २० जणांसह माऊलींच्या पादुका गाडीने घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली आहे.
 
पालखी मार्गावर पुण्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. अशा वेळी पालखी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांच्या सहभागाला प्रशासनाकडूनही परवानगी मिळणार नाही. हे लक्षात घेऊनच अगदी मोजक्या मंडळींच्या सहभागातून आषाढी वारी पूर्ण केली जावी अशी मागणी पुढे आली आहे. येत्या दोन तीन दिवसांतच त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.